ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसत आहे. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यातच आता शिवसेनेला आणखी एक मोठा झटका (big jolt for Shiv Sena) बसला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या ठाण्यातून (Thane) एक मोठी बातमी समोर आली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. इतकेच नाही तर शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनीही उघडपणे पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील माजी महापौर नरेश म्हस्के यांनी उघडपणे आपला पाठिंबा एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत जाहीर पाठिंबा दिला आहे.
हे पण वाचा : माझ्याकडून झालं मोठं पाप, सेना MP ला 'या' गोष्टीचा पश्चाताप
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यात शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रवी फाटक, खासदार श्रीकांत शिंदे यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर ठाण्यातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदेना उघडपणे पाठिंबा देऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा झटका मानला जात आहे.
हे पण वाचा : संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना जोरदार टोमणा
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण 67 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 34, भाजपचे 23, काँग्रेसचे 3 आणि एममआयएणचे 2 सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे मनपावर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे. मात्र, आता नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याने येत्या मनपा निवडणुकीत याचे काय परिणाम होतात हे पहावं लागेल.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 25 जून 2022 रोजी नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ठाण्यातील नगरसेवकांनी नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला.