Bike Fire : टाकी फुल केल्याने बाईकला आग? नालासोपार्‍याचा व्हिडीओ व्हायरल, एक तरुण जखमी

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Apr 13, 2022 | 23:20 IST

नालासोपार्‍यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बाईकला भीषण आग लागली आहे, त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या आगीत बाईकस्वारासह तीन जण जखमी झाले आहेत. 

bike fire nalasaopara
नालासोपारा बाईक आग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नालासोपार्‍यात धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका बाईकला भीषण आग लागली आहे, त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
  • या आगीत बाईकस्वारासह तीन जण जखमी झाले आहेत. 

Bike Fire : ठाणे : नालासोपार्‍यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बाईकला भीषण आग लागली आहे, त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या आगीत बाईकस्वारासह तीन जण जखमी झाले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा भागात एक तरुण बाईकवरून जात होता, तेव्हा या बाईकची एका रिक्षाला धडक झाली. त्यानंतर या दुचाकीच्या टाकीला आग लागली. आग लागल्यानंतर उपस्थित लोकांनी पाणी टाकून ही आग आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग गेल्या काही विझत नव्हती. नंतर या तरुणाने या दुचाकीच्या पेट्रोलची टाकी उघडली. तेव्हा आगीचा एकच भडका उडाला. तरुण या आगीच्या भक्ष्यस्थानी आला तसेच शेजारी उभे असलेल्या रिक्षालाही आग लागली. या रिक्षातील रिक्षा चालक आणि प्रवाशालाही आग लागली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. तरुण आणि इतर दोघांना वाचवण्यात यश आले आहे. 

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टाकी उघडल्यानंतर आग कशी भडकली हे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

टाकी भरल्याने आग?

इंडियन ऑईल कंपनीने काही दिवसांपूर्वी एक सूचना जारी केली होती. त्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत गाडीची टाकी पूर्ण भरू नका अन्यथा गाडीला आग लागेल असा इशारा दिला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टाकी पूर्ण भरल्याने अशी आग लागली असा दावा करण्यात येत आहे. असे असले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी