नवी मुंबईत शिवसेना फोडण्यात भाजपला यश 

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Feb 22, 2021 | 15:00 IST

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले तर नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली.

bjp give jolt to shiv sena in navi mumbai
नवी मुंबईत शिवसेना फोडण्यात भाजपला यश  

थोडं पण कामाचं

  • नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करु - भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
  • नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी - भाजपा नेते आमदार गणेश नाईक
  • शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई : नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले तर नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली.

आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज नवी मुंबई भाजपा निवडणूक प्रभारी आमदार अँड आशिष शेलार आणि गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

क्रिस्टल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्या प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकुण आर्थिकदृष्ट्या विचार करुन सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे 15 लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये 150 कोटींची तरतुद करण्यात यावी अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

तर यावेळी भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल. आ. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचे स्वच्छ शहर झाले. या स्वच्छ शहराला आता भाजपाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनता भाजपालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी