Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, नाईक यांच्या अडचणीत वाढ

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Apr 21, 2022 | 18:43 IST

भाजप आमदार गणेश नाईक हे एका महिलेसोबत २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नाईक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

ganesh naik
भाजप आमदार गणेश नाईक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजप आमदार गणेश नाईक हे एका महिलेसोबत २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.
  • या महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
  • कोर्टाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

Ganesh Naik : ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक हे एका महिलेसोबत २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नाईक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. नाईक यांच्याकडून आपल्या जिवितीला धोका आहे असेही या महिलेने म्हटले आहे. (bjp mla ganesh naik bail denied by court over rape charged )

सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मागील २७ वर्ष गणेश नाईकांचं महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीप होते.  27 वर्ष संबंध असल्याचा सदर महिलेने आरोप केला आहे. इतकेच नाहीतर या रिलेशनशीपमधून या महिलेला एका मुलगा झाला आहे. आता मुलाला गणेश नाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला शिवाय त्याला महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप सदर महिलेनं केला आहे. एवढेच नाहीतर मार्ग 2021 मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी गणेश नाईक यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार या महिलेनं दिली आहे. 

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार नाईक यांचे राज्यात चांगलेच वजन असल्यामुळे अनेक वर्षे मला काहीच करता आले नव्हते. परंतु, आता माझा मुलगा मोठा झाला असून त्याच्या भविष्यासाठी त्यालादेखील त्यांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा मिळावा, अशी मागणी केली आहे. त्याला विरोध करत मुलालाही स्वीकारण्यास नाईकांनी नकार दिला आहे.  मार्च २०२१मध्ये आमदार गणेश नाईक यांनी मला सीबीडी रेतीबंदर येथील लखानी टॉवर्ससमोरील इमारतीत बोलावून घेतले. तेथे मी माझ्या मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माझ्यासमोर बंदूक ठेवून मला त्रास देऊ नको, असे सांगत तू शांत राहिली नाहीस, तर मी स्वतःलाही संपवेन आणि तुम्हा दोघांनाही संपवेन, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला, अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. 

भाजप आमदार गणेश नाईक यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. परंतु कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता २७ तारखेला नाईक यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी