दुरांतो एक्सप्रेस बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Aug 25, 2022 | 08:41 IST

Central Railway traffic disrupted : दुरांतो एक्स्प्रेस खर्डी स्टेशनजवळ बंद पडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Central Railway traffic disrupted
दुरांतो एक्सप्रेस बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दुरांतो एक्सप्रेस बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • प्रवाशांचे हाल

Central Railway traffic disrupted : मुंबई : दुरांतो एक्स्प्रेस खर्डी स्टेशनजवळ बंद पडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे दुरांतो एक्स्प्रेस बंद पडली. यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. घटनास्थळी रेल्वेचे तंत्रज्ञ पोहोचले आहेत. बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. 

खर्डी स्टेशन कुठे आहे?

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे जिल्ह्यात खर्डी स्टेशन आहे. कसाऱ्याच्या दिशेने जाताना तसेच कसारा येथून मुंबईकडे येताना खर्डी स्टेशनवर गाडी थांबते. दोन प्लॅटफॉर्म आणि चार रेल्वे ट्रॅक असे खर्डी स्टेशनचे स्वरुप आहे. याच खर्डी स्टेशनजवळ दुरांतो एक्सप्रेस बंद पडली आहे. तांत्रिक कारणामुळे खर्डी  स्टेशनजवळ दुरांतो एक्सप्रेस बंद पडली आहे. यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे हा मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेतील एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये हा मार्ग पसरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून या मार्गाची सुरुवात होते. मुंबई ते कसारा (मेन लाइन कसारा पर्यंत), मुंबई ते खोपोली (मेन लाइन खोपोली पर्यंत), मुंबई ते पनवेल (हार्बर), ठाणे-पनवेल (ट्रान्सहार्बर), वसई-दिवा-पनवेल, नेरुळ/सीबीडी बेलापूर-उरण एवढ्या मार्गांवर मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे सेवा चालवते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी