Murder In Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Mar 01, 2023 | 07:51 IST

Chief Minister Eknath Shinde Shiv Sena sub division chief or deputy division chief killed in Thane city : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या झाली.

Murder In Thane
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या
  • घटना मंगळवार 28 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली
  • पोलीस तपास सुरू

Chief Minister Eknath Shinde Shiv Sena sub division chief or deputy division chief killed in Thane city : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या झाली. ही घटना मंगळवार 28 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

ठाण्यातील जांभळी नाका येथे शिवसेना उपविभाग प्रमुख रवींद्र परदेशी (48; रा. खारकर आळी, ठाणे) यांची 2 अज्ञातांनी डोक्यात चॉपरने हल्ला करून हत्या केली. रवींद्र परदेशी घरी जात होते, त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

रवींद्र परदेशी ठाण्यातील मुख्य बाजार पेठेत कटलरीचा व्यवसाय करत होते. अंतर्गत वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्ला करून मारेकरी पळून गेले. यानंतर परदेशी यांना जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तपासणी करून डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

"रवींद्र मच्छिंद्र परदेशी यांची अज्ञात इसमाने चॉपरसारख्या धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या केली आहे. यात पक्षाचा संबंध असल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येत नाही, तर वैयक्तिक कारणाने खून झाल्याचं दिसत आहे. फेरीवाल्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, अशी माहिती ठाण्यातील नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली.

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय ।  या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी