200 पोलीस कर्मचाऱ्यांकडून 75 तास तपासणी अन् 1.50 कोटींसाठी अपहरण केलेल्या चिमुकल्याची झाली सुखरूप सुटका

ठाणे
सुनिल देसले
Updated Nov 15, 2022 | 18:54 IST

Thane Police rescue child from kidnapers: ठाणे पोलिसांनी एका 12 वर्षीय मुलाची अपहरणकर्त्यांकडून सुखरुप सुटका केली आहे. तब्बल 200 पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून हे ऑपरेशन यशस्वी केलं आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ठाणे पोलिसांची मोठी कारवाई
  • अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून 12 वर्षीय मुलाची केली सुखरूप सुटका
  • 200 कर्मचाऱ्यांनी 75 तास ऑपरेशन करत मोहिम केली यशस्वी

Thane News: ठाण्यातील एका व्यापाऱ्याच्या 12 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी या मुलाच्या सुटकेसाठी 1.50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाची माहिती ठाणे पोलिसांना मिळताच त्यांनी आपल्या वेगवेगळ्या टीम्स बनवल्या आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (child rescue by thane police from kidnapers after 75 hours search operation maharashtra to gujarat read in marathi)

200 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम अन् 75 तास तपासणी

आरोपी हे अपहरण झालेल्या मुलाला घेऊन ठाणे जिल्ह्यातून नाशिकमध्ये मग पालघर जिल्ह्यात त्यानंतर गुजरातमधील सिल्वासा आणि सुरतमध्ये घेऊन गेले. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तब्बल 200 कर्मचाऱ्यांच्या 20 टीम्स बनवल्या होत्या. या सर्व पोलिसांच्या टीम्सने 75 तासांपर्यंत विविध ठिकाणी तपासणी करुन आरोपींना पकडले आणि पीडित मुलाची सुखरूप सुटका केली.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

2 पुरुष आणि 3 महिलांची टीम

अपहरणकर्त्यांमध्ये 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात रंणजीत हे आपली पत्नी आणि मुलासोबत राहतात. ते एक व्यापारी आहेत. 9 नोव्हेंबर रोजी त्यांचा 12 वर्षीय मुलगा ट्युशनसाठी घराबाहेर पडला. ट्युशन संपल्यावर रात्री 10 वाजेपर्यंत मुलगा घरी येतो मात्र, घटनेच्या दिवशी तो बराचवेळ झाला तरी परतलाच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाचा शोध सुरू केला.

हे पण वाचा : रडण्याने शरीराला होतात अनेक फायदे, वाचा...

थोड्यावेळात अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि त्यांनी खंडणीची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी 1.50 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी थोडाही वेळ न घालवता अपहरणकर्त्यांनी ज्या नंबरवरुन फोन केलेला त्याचं ट्रेसिंग सुरू केलं. घडनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी 20 टीम्स बनवल्या होत्या. ज्यामध्ये एकूण 200 पोलीस कर्मचारी होते.

पोलिसांनी 12 नोव्हेंबर रोजी छापेमारी करत अपहरणकर्त्यांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून 12 वर्षीय चिमुकल्याची सुटका केली. त्यानंतर पीडित मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात 363, 364 (ए) आणि 385 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरहशहा फिरोजशहा रफाई, प्रिस कुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिंद सिंग, नाझिया रफाई अशी आरोपींची नावे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी