CIDCO Lottery 2022: गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून 4158 घरांसाठी लॉटरी जाहीर, वाचा कुठल्या परिसरात किती घरे

ठाणे
सुनिल देसले
Updated Aug 31, 2022 | 00:10 IST

CIDCO Lottery 2022: तुमच्या घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण सिडकोकडून स्वस्त घरांची आणखी एक लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

CIDCO Lottery 2022 announced on occassion of Ganesh Chaturthi for 4158 houses 256 shops read details in marathi cidco maharashtra gov in
CIDCO Lottery 2022: गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून 4158 घरांसाठी लॉटरी जाहीर, तुमच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, वाचा कुठल्या परिसरात किती घरे 
थोडं पण कामाचं
  • सिडकोकडून 4158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, 6 कार्यालये आणि विविध वापरांसाठी भूखंड विक्रीची योजना
  • 'सर्वांसाठी घरे' मिशन अंतर्गत समान संधी निर्माण करण्यासाठी पीएम आवास योजना जाहीर

CIDCO Lottery 2022 latest update news: मुंबई, नवी मुंबई परिसरात आपलं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. तुम्ही सुद्धा नवीन आणि परवडणारे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.आपल्या स्वत:च्या आणि हक्काच्या घराचं स्वप्न आता सिडकोच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. कारण, गणेशोत्ववाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सिडकोकडून 4 हजार 158 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच 245 वाणिज्यिक गाळे, 6 कार्यालये आणि विविध वापरांसाठी भूखंड विक्रीची योजना सुद्धा आहे. (CIDCO Lottery 2022 announced on occasion of Ganesh Chaturthi for 4158 houses 256 shops read details in marathi cidco maharashtra gov in)

"सर्वांसाठी घरे" मिशन अंतर्गत घरे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी "सर्वांसाठी घरे" मिशन अंतर्गत समान संधी निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली PMAY (पंतप्रधान आवास योजना) योजने अंतर्गत परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हे पण वाचा : 'या' ठिकाणी पडतो चक्क हिऱ्यांचा पाऊस, तुम्हाला माहितीये का?​

हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सिडको महामंडळातर्फे, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील 6 कार्यालये आणि त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद निश्चितच द्विगुणीत होणार आहे.

कुठे आणि किती घरे? 

महागृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आहेत. तर उर्वरित 3754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.

हे पण वाचा : अशा टिप्स ज्यामुळे 7 दिवसात दूर करा त्वचेवरील डाग

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये तर अनुदानाची रक्कम 2,50,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यासारख्या सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत.

हे पण वाचा : नोरा फतेहीचा डीप नेक बोल्ड ड्रेस, अंदाज पाहून चाहते क्लीन बोल्ड

इतर योजनांतर्गत सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तारांकीत हॉटेलसाठी एक, निवासी वापरासाठी 64 तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी 5 भूखंड विक्रीकरीता उपलब्ध आहेत.

या लॉटरीच्या संदर्भात सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी