CIDCO Lottery news updates । नवी मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची 5730 घरांची लॉटरी आज प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली. या गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सिडकोचा हा गृहनिर्माण प्रकल्प तळोजा नोड मध्ये उभारण्यात येणार आहे. घर खरेदी करण्यासाठी इच्छुकांना 24 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. एकूण 5730 घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 1524 घर उपलब्ध असणार आहेत तर उर्वरित 4206 घरं साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध असणार आहेत.
लॉटरीची मुदत जाहीर झाल्यानंतर एक महिना (24 फेब्रुवारी पर्यंत)या लॉटरीतील घरांसाठी अर्ज भरण्याची मुदत असेल. सिडकोने पाचनोडमध्ये २४ हजार घरांचे बांधकाम सुरू केले आहे. या घरांची लॉटरी २ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. टप्याटप्याने सहा वेळा लॉटरी काढण्यात आली. सात हजार घरे अपात्र ठरली आहेत. प्रतीक्षा यादीवरील पात्र लाभार्थींनादेखील घरांचे वाटप केले जात आहे. सात हजार घरे अपात्र ठरली असताना तेवढ्याच घरांचा ताबा देण्यात आला आहे. शिल्लक घरांची विक्री सिडको नव्याने करणार आहे.
अधिक वाचा : ... मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या, चंद्रकांत पाटलांचा मविआला टोला
नव्या लॉटरी प्रक्रियेतील अर्ज ऑनलाइन विकले जातील. मुख्यमंत्री किंवा नगरविकासमंत्री यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
सिडकोने २०१८च्या लॉटरीत नवी मुंबई, पनवेल तसेच उरणमध्ये तळोजा, कळंबोली, खारघर, द्रोणागिरी, घणसोली येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. यातील तळोजामधील घरे जास्त शिल्लक आहेत. या घरांचा समावेश नव्या लॉटरीत असेल.