Clash between customer and delivery boy over parcel money in Dombivli : डोंबिवलीत लोढा हेवनच्या परिसरात पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉय यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी या प्रकरणात तपास केला, सीसीटीव्ही फूटेज बघितले आणि कारवाई केली.
लोढा हेवन परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या सुनील मिश्रा नावाच्या व्यक्तीने एका फूड डिलिव्हरी कंपनीकडून एक हजार रुपयाचे पनीर आणि इतर खाण्याच्या वस्तू घरी मागवल्या होत्या. डिलिव्हरी बॉय सुनील मिश्रा यांचे पार्सल घेऊन त्यांच्या इमारतीत पोहोचला. इमारतीत पार्सलचे पैसे देण्याघेण्यावरून सुनील मिश्रा आणि डिलिव्हरी बॉय यांच्यात वाद झाला.
डिलिव्हरी बॉयने मालकाला सांगून दुकानातील स्टाफ आणि काही ओळखीतल्यांना बोलावून घेतले. यानंतर डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या सोबत असलेल्यांनी सुनील मिश्रा यांच्यावर हल्ला केला. मिश्रा यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. जोरदार हाणामारी झाली. ही घटना परिसरातील कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि सर्वांना कायदेशीर नोटीस बजावली.
रिकाम्या पोटी हे पदार्थ खा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा
एका महिन्यात पंधरा किलो वजन घटवण्यासाठी करा हे डाएट