CM शिंदेंनी केले मुंब्रा येथील Y जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 13, 2022 | 22:29 IST

CM Eknath Shinde inaugurated Mumbra Y Junction flyover : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

CM Eknath Shinde inaugurated Mumbra Y Junction flyover
CM शिंदेंनी केले मुंब्रा येथील Y जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • CM शिंदेंनी केले मुंब्रा येथील Y जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण
  • जेएनपीटी आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग वाढणार
  • प्रवासाच्या वेळेत आणि इंधनात बचत होणार

CM Eknath Shinde inaugurated Mumbra Y Junction flyover : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होईल. प्रवासाच्या वेळेत आणि इंधनात बचत होईल. उड्डाणपूल कार्यरत झाल्यामुळे जेएनपीटी आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग वाढणार आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारीकरण करण्याचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांमुळे स्थानिकांचे आयुष्य सुखकर होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

भारतात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख विवाह

Alert : येत आहे शनि साडेसाती आणि शनि ढय्या

उड्डाणपूल प्रकल्प

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हा ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा - कल्याण फाटा जंक्शन या भागातून जातो. मुंब्रा वाय जंक्शनवरील एमएमआरडीएने बांधलेल्या 3+3 अशा दुहेरी मार्गिकेच्या (लेन) उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहतूक आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक विभक्त होईल. वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. जेएनपीटी आणि गुजरातच्या सीमेवरून येणार्‍या अवजड कंटेनरच्या वाहतुकीसाठी उड्डाणपूल उपयुक्त ठरेल. मुंब्रा शहरातून येणाऱ्या स्थानिक वाहतुकीमुळे होणारी गर्दीदेखील टळेल. उड्डाणपुलाची एकूण लांबी पोहाचमार्गासह (अॅप्रोच रोडसह) 820 मी. असून रुंदी 24.20 मीटर (3+3 मार्गिका/लेन ) इतकी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी