Panvel Water Cut : पनवेलकरांना प्रशासनाने दिलं New Year चं भलतच गिफ्ट, जानेवारीपासून पाणीकपात

ठाणे
Updated Dec 30, 2022 | 13:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

रायगड : पनवेल शहर महानगरपालिकेने उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू नये म्हणून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. 

Panvel water scarcity
पनवेलरांचा वाढला ताप, जानेवारी पासून पाणीकपात   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • 128046 लोकसंख्येला शनिवार, रविवारी पाणी मिळणार?
  • पाऊस पडूनही जलसंकट का?
  • आयुक्त गणेश देशमुख काय म्हणाले ?

पनवेल : नवीन वर्षाच्या स्वागताची आपण सर्वच जोमाने तयारी करत आहोत. अशा आनंदाच्या मनस्थितीत पनवेलकरांच्या (Panvel) उत्साहाला ग्रहण लावणारी बातमी समोर येते आहे. न्यू इयरच गिफ्ट म्हणून की काय, पनवेल (Panvel)  शहर महानगरपालिकेने पनवेलवासियांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. 128046 लोकसंख्या असणाऱ्या पनवेलला जलसंकटाशी दोन हात करावे लागणार आहेत. पाणीकपात होण हे काही नागरिकांसाठी नवं नसलं, तरी जे गेल्या अनेक वर्षांत झालं नाही, ते 2023 मध्ये होणार आहे.  (Coming Jan Panvel facing water cut )

अधिक वाचा : 2022 मध्ये या दहा कलाकारांनी सोडलं जग

पाणीकपातीसाठी तयार आहात?

कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेलमध्ये नवीन वर्षापासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येणार आहे. दुःखात सुख इतकचं की, पनवेल शहर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, फक्त सोमवार ते शुक्रवार या आठवड्यातील पाच दिवसापैंकी कोणाताही एक दिवस पाणीकपात केली जाईल. 
 

43,107 कुटुंबांवर संकट ?

रायगड जिल्ह्यात संपूर्ण पनवेल तालुक्यात सध्या तरी जलकपात करण्याची चिन्हे नसल्यामुळे, डोक्याला हात लावून घेण्याच कारण नाही.  शनिवार आणि रविवार सोडून या भागात पाणीकपात करण्यात येणार आहे. 

कुठे होणार पाणी कपात - 

- पनवेलच्या मध्यातला ठाणे नाका
- गंगाराम नाट्य मंडी प्रांगण
- सब्जी मंडी
- पटेल मोहल्ला 

अधिक वाचा : जान्हवी कपूरचे बिकिनीतले बोल्ड फोटो

पण पाणीकपात कशासाठी?

हवामान खात्याच्या अहवालानुसार, मे पासून नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या या भागात पाऊस पडतो आणि पनवेलची रोजची पाण्याची गरज साधारणतः ३० ते ३२ एमएलडी एवढी आहे. पालिकेच्या देहरंग धरणात गाळ साचल्यामुळे, धरणाची क्षमता गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. त्यामुळे उर्वरीत पाणी पनवेल शहर महानगरपालिका MJPआणि MIDC कडून आयात करते. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता आणि इतर स्त्रोतांवरच अवलंबित्व कमी करण्यासाठी PCMC ने हे पाऊल उचललं आहे. 

अधिक वाचा : 42 व्या वर्षीही श्वेता तिवारी दिसते 24 वर्षांची सुंदर नार, काय आहे रहस्य

पाणीकपात कधीपर्यंत?

जाहीर सूचनेद्वारे महानगरपालिकेने सांगितले की, ही पाणीकपात १५ जूनपर्यंत असणार आहे.

पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, उन्हाळ्यात पनवेलवासीयांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील ही पाणीकपात पावसाळा सुरू होईपर्यंत राहणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी