कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हळद-लग्न समारंभात सहभागी, पाहुण्यांची चिंता वाढली! 

ठाणे
रोहित गोळे
Updated Mar 29, 2020 | 11:47 IST

डोंबिवली येथील एका हळद आणि लग्न समारंभात कोरोना बाधित रुग्ण सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

corona positive patients attend a wedding ceremony in dombivali raised guest concerns
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हळद-लग्न समारंभात सहभागी, पाहुण्यांची चिंता वाढली!   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्ण हळद आणि लग्न समारंभाला होता हजर
  • कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्व येथे एक-एक रुग्ण आढळून आले
  • कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आता ८ कोरोनाबाधित रुग्ण

कल्‍याण: कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ०२ कोरोनाबाधित नवीन रूग्‍ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रूग्‍णांची संख्‍या ८ झाली आहे. एक नवीन रूग्‍ण हा कल्‍याण पूर्वेतील चिंचपाडा येथील आहे तर दुसरा रुग्ण हा डोंविबली पूर्वेतील राजाजी पथ येथील आहे. दरम्यान हे दोन्ही रुग्ण ज्या परिसरात राहतात तेथे आता महापालिकेच्‍या नागरी आरोग्‍य केंद्रामार्फत सर्वेक्षण  सुरू करण्यात आलं आहे. 

कल्‍याण पूर्वेतील रूग्‍ण हा काही दिवसांपूर्वीच आर्यलॅंडवरून परतला होता. त्यानंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे जेव्हा त्यांनी आपली चाचणी करुन घेतली तेव्हा तो पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तर डोंबिवलीमघील रूग्‍ण हा १८ मार्च रोजी एका हळदी समारंभाक आणि १९ मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील आयोजित लग्‍न सोहळयास उपस्थित असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, दोन्‍ही रूग्‍ण हे मुंबईतील कस्‍तुरबा रूग्‍णालयात दाखल असून दोघांची त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील लग्‍न सोहळयास तसेच हळदी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ स्‍वतःला १४ दिवस होम क्‍वॉरंटाईन करावं. जर नागरिकांना आजारसदृश्‍य लक्षणे आढळल्‍यास त्‍वरीत महापालिका रुग्‍णालयात येऊन तपासणी करुन घ्‍यावी. असे आवाहन महापालिकेमार्फत करण्‍यात येत आहे.

भारतात आतापर्यंत ९३३ रुग्ण आढळले! 

भारतात कोरोना व्हायरसची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १०३७ रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८५ रुग्ण हे बरे झाले आहेत.

जगाचा विचार केला तर आतापर्यंत कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या 6 लाखांहून अधिक झाली आहे. तर संपूर्ण जगात कोरोनामुळे २७,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. इटलीमध्ये एका दिवसात एक हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी