रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना विद्यार्थीनीची चित्रातून भावनिक साद, चित्र होतंय व्हायरल 

ठाणे
Updated Mar 25, 2020 | 19:54 IST

देशाला कोरोनाच्या संकटातून वाचविण्यासाठी आरोग्य सेवक आणि पोलीस हे आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची परवा न करता झटत आहेत. यांच्यामुळे देश सुरक्षित असल्याची भावना सर्व देशवासियांमध्ये रुजली आहे. याच आशयाचे एक चित्र स

coronavirus vaidhehi mahendra deshmukh draw painting medical staff and police
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना विद्यार्थीनीची चित्रातून भावनिक साद, चित्र होतंय व्हायरल   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आरोग्य सेवक आणि पोलिसांच्या कामाला विद्यार्थींनीचा चित्रातून सलाम
  • कर्तव्यदक्ष पोलीसाची मुलगी वैदेहीची नागरिकांना भावनिक साद
  • अनेकांनी आपल्या फेसबूक, व्हॉट्सअॅप स्टेटसवरही हा फोटो ठेवला आहे. 

कल्याण :   देशाला कोरोनाच्या संकटातून वाचविण्यासाठी आरोग्य सेवक आणि पोलीस हे आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची परवा न करता झटत आहेत. यांच्यामुळे देश सुरक्षित असल्याची भावना सर्व देशवासियांमध्ये रुजली आहे. पण काही जण घरी न थांबता आरोग्य सेवक आणि पोलिसांच्या कामावर विनाकारण ताण आणत आहेत. अशा व्यक्तींना घरी राहण्याची भावनिक साद एका चित्राच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीने घातली आहे. हे चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी आपल्या फेसबूक, व्हॉट्सअॅप स्टेटसवरही हा फोटो ठेवला आहे. 

हे चित्र काढले कल्याणमध्ये १०वीत शिकणाऱ्या वैदेही महेंद्र देशमुख हीने. वैदेही ही केसी गांधी विद्यालयात शिकायला आहे. तिचे वडील पोलीस खात्यात कार्यरत आहे.  १० वीची परीक्षा वैदेहीने दिली असून तिचा एक पेपर अजून शिल्लक आहे. पण तीने गेल्या काही दिवसात टीव्हीवर बातम्या पाहिल्या. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशवासियांना घरातच राहण्याची विनंती केली आहे.  असे असताना अनेक जण बाहेर विनाकारण फिरत त्यामुळे पोलिसांवर आणि आरोग्य यंत्रणेवर विनाकारण ताण येत असल्याचे तिच्या निदर्शनात आले.  त्यामुळे डॉक्टर आणि पोलीस यां दोघांच्या कामाची नागरिकांनी दखल घ्यावी यासाठी वैदेही हिने हे चित्र काढले आहे. 

वैदेही स्वतः घरात असून ती इतरांनाही घरात बसण्याचे आवाहन या चित्राच्या माध्यमातून करत आहे. तीचे वडील महेंद्र पोपटराव देशमुख हे मुंबई पोलिसात माटुंगा येथे पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत. आपले वडील या जागतिक संकटाच्या काळात कुटुंबाची आणि स्वतःची काळजी न करता कामावर रुजू होताहेत, हे ती जवळून पाहत आहे. तिला त्यांची काळजी वाटते पण देशसेवेपुढे तीन आपल्या भावनाना मुरड घातले. पण असे करताना सरकारच्या नियमांचे पालन कर करणाऱ्यांना आपल्या चित्रच्या माध्यमातून वैदेहीने भावनिक साद घातली आहे. 

तिचे हे चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या फोटोला स्टेट म्हणून आपल्या मोबाईलमध्ये जागा दिली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...