खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या; अफझल आणि इमरानला अटक

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Aug 04, 2022 | 18:45 IST

Crime : Duo kidnaps 13-yr-old boy for ransom, kills him : ठाणे जिल्ह्यात मीरा रोडमध्ये काशिमीरा येथे धक्कादायक घटना घडली. खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली.

Crime : Duo kidnaps 13-yr-old boy for ransom, kills him
खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या
  • अफझल आणि इमरानला अटक
  • पोलिसांनी दिली माहिती

Crime : Duo kidnaps 13-yr-old boy for ransom, kills him : ठाणे जिल्ह्यात मीरा रोडमध्ये काशिमीरा येथे धक्कादायक घटना घडली. खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडून देण्याच्या बदल्यात २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून पैसे देणे मुलाच्या आईला आर्थिकदृष्ट्या कठीण होते. मुलाची आई पैसे देऊ शकत नाही हे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी मुलाची हत्या केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाचा मृतदेह वळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जागेवर बेवारस सोडून दिला. हा मृतदेह दुपारच्या सुमारास पोलिसांना आढळला आणि मुलाच्या आईला माहिती देण्यात आली.

हत्या झालेल्या मुलाचे नाव मयंक ठाकुर असे होते. मयंकची अफझल अन्सारी आणि इमरान शेख या दोन जणांशी मैत्री होती. मयंक अनेकदा अफझल आणि इमरानशी गप्पा मारायचा. या गप्पांमधूनच मयंकची आई गायिका असल्याचे अफझल आणि इमरानला लक्षात आले. घरात गायिका आहे म्हणजे भरपूर पैसा असेल असे समजून अफझल आणि इमरानने मयंकला एक नवा स्मार्टफोन आणि सिमकार्ड फ्री मिळेल असे सांगून विशिष्ट ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. मयंक घटनास्थळी येताच त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर मयंकच्या आईकडून पैसे मागण्यात आले.

मयंकची आई गायिका असली तरी ती बारमध्ये गायिका म्हणून कार्यरत होती. तिच्याकडे मुलाला सोडवून आणण्यासाठी मोठी रक्कम नव्हती. यामुळे तिने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पण पैसे मिळत नाहीत आणि मुलाला सोडून दिले तर पकडले जाऊ असा विचार करून  अफझल आणि इमरानने मयंकची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गळा आवळून तसेच चाकू मारून मयंकची हत्या करण्यात आली. तसेच मयंकच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून ते फेकून दिले. पण पोलिसांनी मयंकच्या ओळखीतल्या प्रत्येकाची माहिती जाणून घेतली आणि चौकशी सुरू केली. यामुळे अफझल आणि इमरान अडचणीत सापडले. दोघे विशिष्ट कालावधीत कामाच्या ठिकाणी गैरहजर होते हे कळताच पोलिसांचा संशय बळावला. दोघांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले ते एकत्र असल्याचे तसेच काही काळ त्यांच्यासोबतच मयंकचा मोबाईल अॅक्टिव्ह होता अशी माहिती पोलिसांच्या हाती आली. यानंतर पोलिसांनी अफझल आणि इमरान या दोघांना शोधून अटक केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी