धक्कादायक, सात वर्षीय चिमुकलीवर गँग रेप 

ठाणे
Updated Sep 23, 2019 | 14:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

 कल्याण पश्चिममध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यावर आपल्या रिक्षाची वाट पाहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर तिघा नराधमांनी गँगरेप केल्याची संतापजनक घटना घटना घडली आहे.

crime news gang rape of 7 year old girl 3 men arrested from kalyan maharashtra news in marathi
धक्कादायक, सात वर्षीय चिमुकलीवर गँग रेप  

थोडं पण कामाचं

  • खाऊचे आमिष दाखवून तीन नराधमांचा चिमुरडीवर बलात्कार
  • अनेक वेळा चिमुरडीवर केला सामुहीक अत्याचार
  • पोक्सो कायद्यातंर्गत तिघांवर गुन्हा दाखल

कल्याण :  कल्याण पश्चिममध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यावर आपल्या रिक्षाची वाट पाहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर तिघा नराधमांनी गँगरेप केल्याची संतापजनक घटना घटना घडली आहे. या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी १९ वर्षीय विक्रम पुरोहित, २४ वर्षीय नवीन जसुजा आणि ३४ वर्षीय अजय दोहारे या तिघांविरूद्ध केस दाखल करून अट करण्यात आली आहे. 

पहिल्या इयत्तेत शिकणारी ही पीडित मुलगी कल्याण पश्चिम भागात राहते. पालकांनी मुलीला सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी रिक्षा ठरवून दिली होती. शाळा सुटल्यावर शाळेबाहेर ती रिक्षाची वाट पाहत होती. हे आरोपींना माहिती होते. त्यामुळे अशी संधी शोधून शाळेबाहेर दुकाने असलेल्या विक्रम, नवीन आणि अजय यांनी या चिमुरडीशी ओळख वाढवली. तिला खाऊ देऊन तिला शाळेसमोर असलेल्या एका पडकी पडलेल्या इमारतीत नेऊन गँगरेप करत असतं. रिक्षाचालक  तिला घेण्यासाठी येत असे तो पर्यंत ते शाळेबाहेर तिला सोडून देत असतं. त्यामुळे अनेक दिवस हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही.  त्यामुळे या नराधमांनी तिच्यावर अनेकवेळा सामुहिक बलात्कार केला. 

पण तिच्या वागण्यात आलेल्या बदलामुळे तिच्या आजीला संशय आला. आजीने या मुलीला विचारले, त्यानंतर तिने आपल्यावर अशा प्रकारे अत्याचार होत असल्याची संपूर्ण हकिकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी या  तीन नराधमांविरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत त्या तिघांना अटक करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...