...म्हणून आयडीबीआय बँकेचे ग्राहक धास्तावले

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Apr 15, 2021 | 16:16 IST

cyber attack on idbi bank आयडीबीआय बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आणि निवडक खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर एका अज्ञात खात्यात वळती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

cyber attack on idbi bank
...म्हणून आयडीबीआय बँकेचे ग्राहक धास्तावले 

थोडं पण कामाचं

  • ...म्हणून आयडीबीआय बँकेचे ग्राहक धास्तावले
  • निवडक खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर एका अज्ञात खात्यात वळती करण्यात आली
  • तपास सुरू आहे

डोंबिवली: आयडीबीआय बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आणि निवडक खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर एका अज्ञात खात्यात वळती करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतल्या आयडीबीआय बँकेच्या निवडक खातेदारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. संबंधित खातेदारांनी स्थानिक पोलिसांकडे दाद मागितली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांकडे सायबर हल्ल्याप्रकरणी विचारणा केल्यावर काही संशयास्पद व्यवहार झाले असून या व्यवहारांची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. cyber attack on idbi bank

निवडक खात्यांवरच सायबर हल्ला होण्यामागचे कारण काय, हे अद्याप समजलेले नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने संशयितांना हेरुन चौकशी करत आहेत. दोषींवर नियमानुसार कारवाई होईल, असे संकेत स्थानिक पोलीस आणि बँकेच्या प्रशासनाने दिले. 

सायबर हल्ल्याचे वृत्त पसरताच अनेक ग्राहकांनी आयडीबीआय बँकेच्या डोंबिवलीतल्या फडके मार्गावरील शाखेत गर्दी केली. स्वतःचे पैसे सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पासबुक अपडेट करुन देण्याची मागणी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी