उपमहापौर जगदीश गायकवाडांना कोरोनाचा विसर, वाढदिवसाच्या सोहळात नाचवली 'शांताबाई'

ठाणे
भरत जाधव
Updated Dec 30, 2021 | 12:27 IST

नागरिकांनी जर कोरोनाचे नियम पाळले नाही तर कडक निर्बंध (Restrictions) लादण्यात येतील असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु कोरोनाची भीती फक्त सामान्य लोकांसाठीच आहे, असा प्रश्न उपमहापौर (Deputy Mayor) गायकवाडांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यावरुन उपस्थित होत आहे.  

Deputy Mayor Jagdish Gaikwad
उपमहापौर जगदीश गायकवाडांना कोरोनाचा विसर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा वाढदिवस होता.
  • या सोहळ्याला महापौर कविता चौतमोल आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित.
  • महापौर कविता चौतमोल ह्यांनी मास्क देखील घातलेलं नव्हते.

पनवेल : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची (Patients) संख्या वाढू लागली आहे. यामुळे राज्य सरकारची (State Government) चिंता वाढली असून राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी जर कोरोनाचे नियम पाळले नाही तर कडक निर्बंध (Restrictions) लादण्यात येतील असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु कोरोनाची भीती फक्त सामान्य लोकांसाठीच आहे, असा प्रश्न उपमहापौर (Deputy Mayor) गायकवाडांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यावरुन उपस्थित होत आहे.  

उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा वाढदिवस होता, मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्याला महापौर कविता चौतमोल आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर कविता चौतमोल ह्यांनी मास्क देखील घातलेलं नव्हते. विशेष म्हणजे महापौर कविता चौतमोल यांना एकदा कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान हा वाढदिवस फुटपाथवर साजरा करण्यात आला त्यावेळी कोरोना नियमाच पालन करण्यात नाही आले. तसेच लावणी कार्यक्रम साजरा करण्यात आला ह्याला परवानगीदेखील नव्हती. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट वाढू लागले आहे.   मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होऊ लागली असून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढीने गती पकडली आहे. यामुळे राज्य शासनाची चिंता वाढू लागली आहे. परंतु हा कोरोनाचा धाक फक्त राज्यातील सामान्य लोकांसाठीच आहे का? असा प्रश्न पडत आहे. एकीकडे कोरोनाची संख्या वाढत आहेत. तर दुसरीकडे खुद्द उपमहापौर जगदीश गायकवाड यांना कोरोनाचा विसर पडत,  आपला वाढदिवसाचा धडाक्यात साजरा केला आहे. 

वाढदिवसाचा हा कार्यक्रम रस्त्याला चिटकून असल्याने वाहतूक कोंडीदेखील झाली. तसेच रुग्णवाहीका जात असताना तिकडे कोणाचे लक्ष नव्हते त्याचबरोबर पोलिसांचे वाहन व पोलीस आले असून देखील ते कार्यक्रमाची मजा बघत होते बागण्याची भूमिका घेत होते. पनवेलमध्ये रात्रीच्या वेळी उपमहापौराच्या वाढदिवसाच्या वेळी कोरोना गायब झालेला दिसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी