Dog attack zomato boy CCTV: डिलिव्हरीसाठी आलेल्या झोमॅटो बॉयवर कुत्र्याचा हल्ला, shocking VIDEO

ठाणे
सुनिल देसले
Updated Aug 30, 2022 | 18:50 IST

Dog attacks on Zomato delivery boy: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ही घटना घडली आहे.

dog attacks on zomato delivery boy in navi mumbai incident caught in lift cctv shocking video viral
Dog attack zomato boy CCTV: डिलिव्हरीसाठी आलेल्या झोमॅटो बॉयवर कुत्र्याचा हल्ला, shocking VIDEO 
थोडं पण कामाचं
  • नवी मुंबईतील धक्कादायक घटना
  • डिलिव्हरीसाठी आलेल्या झोमॅटो बॉयवर कुत्र्याचा हल्ला
  • संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीत कैद

Dog bits to Zomato delivery boy: सध्याच्या काळात ऑनलाईन माध्यमातून अनेकजण खाद्यपदार्थ मागवतात. त्याच झोमॅटो, स्विगी सारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून नागरिकांना घरी बसल्या-बसल्या सर्व खाद्यपदार्थ मिळतात. त्याच प्रकारे नवी मुंबईतील एका व्यक्तीने झोमॅटो अ‍ॅपवरुन एक ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर घेऊन झोमॅटो बॉय आला सुद्धा मात्र तो पुन्हा परतत असताना त्याच्या सोबत एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. (dog attacks on zomato delivery boy in navi mumbai incident caught in lift cctv shocking video viral)

नेमकं काय घडलं?

ही घटना पनवेल तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलमधील कोन इंडियाबुल्स येथील एका नागरिकाने झोमॅटोवरुन आपली ऑर्डर दिली होती. त्याची ही ऑर्डर पोहोचवण्यासाठी झोमॅटो डिलिव्हरी बॉय इमारतीत आला. त्याने संबंधित व्यक्तीला त्याची ऑर्डरही डिलिव्हर केली. मात्र, परतत असताना लिफ्टच्या बाहेरच त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.

लिफ्टमधून झोमॅटो डिलिव्हरी बॉय इमारतीच्या तळमजल्यावर आला. तेथे लिफ्टचा दरवाजा उघडताच समोर एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन उभी होती. समोर कुत्रा पाहून हा डिलिव्हरी बॉय सुद्धा थोडा दचकला. त्यानंतर या पाळीव कुत्र्याच्या मालकाने त्या कुत्र्याला लिफ्टपासून थोड दूर नेलं. मग, झोमॅटो डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर निघत होता. मात्र, तितक्यात या पाळीव कुत्र्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला.

हे पण वाचा : भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? रात्री भटकतात आत्मा?

तरुणाच्या लिफ्ट मधून बाहेर पडताना कुत्र्याने त्याचा चावा घेतल्याचे समोर आले आहे. कुत्रा चावा घेतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. झोमॅटो चा डिलिव्हरी बॉय 11 एफ या इमारतीमध्ये वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता यावेळी लिफ्ट मधून बाहेर पडताना त्याच  इमारतीतील व्यक्ती कुत्र्याला घेऊन लिफ्ट मध्ये जातअसताना कुत्र्याने डिलिव्हरी बॉयच्या चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर या तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी