पोलिसच करायचे अमली पदार्थाची तस्करी, 2 लाखांच्या मुद्देमालासह दोन कर्मचारी अटकेत

Drug smuggling : कल्याण पश्चिम भागात चरसची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस खात्यात कार्यरत असलेला दोघांचा यामध्ये समावेश असून त्याच्याकडून सुमारे दोन लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. .

Drug smuggling was done by the police, two employees arrested with 4 lakhs worth of goods
पोलिसच करायचे अमली पदार्थाची तस्करी, 2 लाखांच्या मुद्देमालासह दोन कर्मचारी अटकेत ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कल्याणमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई
  • संशयितांकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धक्कादायक म्हणजे आरोपी हे स्वत: पोलीस खात्यात नोकरी करतात

कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात अंमलीपदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन संशयितांकडून तब्बल दोन लाखांचा चरस जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपी आहे रेल्वे पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात. ठाणे शहराच्या गुन्हे शाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी केलेल्या कारवाईत रेल्वे पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे या दोघांना अटक केली आहे. (Drug smuggling was done by the police, two employees arrested with 4 lakhs worth of goods)

अधिक वाचा : जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण दिसल्यानं वेटरला मारहाण, वेटरचा मृत्यू : पहा व्हिडिओ

याबाबत माहिती अशी की, सीएसएमटीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाची रेल्वे पोलिसांनी बॅगची झाडाझडती घेतली असता बॅगमध्ये चरस सापडले होते. रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाई करण्याऐवजी तोडपाणी करून त्या आरोपीला सोडण्यात आले. त्यानंतर चरस ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांनी परस्पर विक्री करण्याचा प्लॅन केला.

अधिक वाचा : Narayan Rane Bungalow: बुलडोझरच्या भीतीपोटी राणे पाडताय अधीश बंगल्याचं बांधकाम

 त्यानुसार मंगळवारी दुर्गाडी किल्ल्याजवळील पोलीस हवालदार वसेकर आणि पोलीस शिपाई विशे दोघे वेगवेगळ्या दुचाकीवर आले. तिथे ते एकाला त्याची विक्री करणार होते. पण ठाणे  अंमलीपदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला. त्यानुसार वसेकर आणि विशे यांच्या तपासणी केली असता त्यांच्याकडून सुमारे ८०० ते ९०० ग्राम चरस आढळून आले. ते जप्त करुन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  या चरसची तस्करी केल्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार आदींचीही चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी