ठाणे : महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी करत एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना दररोज धक्क्यांवर धक्के देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आह़े. त्यानंतर आता तीन महिन्यानंतर ठाकरे गटानेही एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. ठाण्यातील एका नगरसेविकाने मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Eknath Shinde was given a blow by the Thackeray group)
ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आणतं पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली होती. या नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत मार्चमध्ये संपुष्टात आली. पालिकेची अद्याप निवडणूक झालेली नाही. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यातील 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी ठाकरेंसोबत राहणे पसंत केले.
अधिक वाचा : Chitra Wagh : संजय राठोड यांच्या प्रश्नावर चित्रा वाघ भडकल्या, मला शिकवू नका म्हणत पत्रकारला सुनावले
ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिका आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचे उघडपणे समर्थन केले. त्यामुळे काहीशा बॅकफूटवर असलेल्या ठाकरे गटाने आज शिंदेना धक्का दिला आहे. शिंदे गटाच्या ठाण्यातील नगरसेविका माजी नगरसेविका रागिणी वेरिशेट्टी व भास्कर वेरिशेट्टी यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी येऊन वेरिशेट्टी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला.
अधिक वाचा : Crime News जन्मदात्या बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट, पोलीस घेतायेत मुलीचा शोध
यावेळी रागिणी वेरीशेट्टी यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचं वचन उद्धव ठाकरे यांना दिलं. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.