Vashi : वाशीच्या पाळणाघरात 16 महिन्यांच्या मुलाला थोबाडीत मारले

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Feb 15, 2023 | 06:08 IST

employee slap 16 month old child in day care center vashi navi mumbai : नवी मुंबईतील वाशीतल्या 'स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटर' या पाळणाघरात 16 महिन्यांच्या मुलाला थोबाडीत मारल्याचा तसेच उचलून बाजूला ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

employee slap 16 month old child in day care center vashi navi mumbai
वाशीच्या पाळणाघरात 16 महिन्यांच्या मुलाला थोबाडीत मारले 
थोडं पण कामाचं
  • वाशीच्या पाळणाघरात 16 महिन्यांच्या मुलाला थोबाडीत मारले
  • सीसीटीव्ही फूजेटमध्ये दिसला धक्कादायक प्रकार
  • पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला

employee slap 16 month old child in day care center vashi navi mumbai : नवी मुंबईतील वाशीतल्या 'स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटर' या पाळणाघरात 16 महिन्यांच्या मुलाला थोबाडीत मारल्याचा तसेच उचलून बाजूला ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पाळणाघराकडून मुलांच्या पालकांना सीसीटीव्ही फूटेजची लिंक देण्यात आली होती. या लिंकवर फूटेज बघितल्यानंतर पालकांना धक्कादायक प्रकार लक्षात आला. या प्रकरणी वाशी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. 

तक्रारीची माहिती मिळताच पाळघर व्यवस्थापनाने पालकांना दिलेली सीसीटीव्ही फूटेज बघण्याची लिंक बंद केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याने पाळणाघरातील इतर दिवसांचे सीसीटीव्ही फूटेज तपासता आले नाही तसेच अद्याप कारवाई झालेली नाही अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे. तपास सुरू आहे, अशी मोघम माहिती या प्रकरणात पोलिसांनी दिली.

SSC HSC Exam : बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान, दहावी बारावी परीक्षेच्या केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं ठेवणार बंद

Pune-Nashik highway Accident :पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव कारने महिलांना चिरडलं; 5 जागीच ठार, 13 जणींवर उपचार सुरू

मुल घाबरले, झोपत नाही

पाळणाघरात महिला कर्मचाऱ्याने थोबाडीत मारले आणि बाजूला ढकलून दिले. यामुळे घाबरलेले 16 महिन्यांचे मूल मागील काही दिवसांपासून व्यवस्थित झोपत नाही. यामुळे पालकांना संशय आला आणि त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ही माहिती मुलाच्या पालकांनी मीडियाला दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी