Nashik Long March : शेतकऱ्यांचं वादळ परतणार, सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून लाँन्ग मार्च काढला होता. ठाणे जिल्ह्यातील वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडू बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा माजी आमदार जे. पी. गावित यांनी केली.

farmers' long march suspended, 70 percent of demands accepted by the government
Nashik Long March : शेतकऱ्यांचं वादळ परतणार, सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला
  • शेतकरी वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून होते.
  • शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या

ठाणे : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेले हजारो शेतकरी आणि आदिवासी बुधवारपासून ठाणे जिल्ह्यात वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडू बसलेल्या शेतकऱ्यांनी सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा माजी आमदार जे. पी. गावित यांनी केली. (farmers' long march suspended, 70 percent of demands accepted by the government)

अधिक वाचा : Mumbai Traffic : मुंबईतले हे जुने पूल तोडणार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो शेतकरी रविवारी पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले. बुधवारी शेतकरी ठाणे जिल्ह्यात पोहोचले.  दरम्यान, राज्य सरकारच्या दोन मंत्र्यांनी सुमारे दोन हजार शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. तासभर चर्चा केली. यासंदर्भात महाराष्ट्रातील दादा भुसे आणि अतुल सावे या दोन मंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

अधिक वाचा : Mumbai Railway Megablock News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर नाही मेगाब्लॉक

शेतकरी प्रतिनिधींसोबत 14 मुद्द्यांवर चर्चा झाली आणि 5 मागण्यांवर चर्चा सकारात्मक झाली. यावर सविस्तर चर्चा केली जाईल. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

अधिक वाचा : Central Government : कर्मचाऱ्यांना कोविड काळातील 18 महिन्यांचा महागाई भत्ता देण्यास नकार

आज सकाळी माजी आमदार जे पी गावित आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गावित म्हणाले की, "राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत." जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी