भिवंडीत ५० गोदामं जळून खाक

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Oct 16, 2021 | 12:40 IST

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे आग लागल्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा ५० गोदामं जळून खाक झाली. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

fire in bhiwandi
भिवंडीत ५० गोदामं जळून खाक 
थोडं पण कामाचं
  • भिवंडीत ५० गोदामं जळून खाक
  • दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली
  • जीवितहानी झालेली नाही

भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे आग लागल्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा ५० गोदामं जळून खाक झाली. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. fire in bhiwandi

दसऱ्याच्या रात्री भिवंडीतील मोठ्या फर्निचरच्या गोदामाला आग लागली. ही आग वेगाने पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही दुर्घटना भिवंडी-ठाणे मार्गावरील भिवंडी तालुक्यातील कशेळी टोलनाक्याजवळ घडली. महालक्ष्मी फर्निचरच्या गोदामाला आग लागली आणि ती वेगाने पसरली. आग नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे सहा तास अग्नीशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आग लागल्यावर परिसरातील विजेचा पुठवठा खंडीत करण्यात आला होता. नारपोली पोलीस दुर्घटनेची चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी