पालघरमध्ये गोळीबार, २ जखमी

firing in palghar two injured पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका बारच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

firing in palghar two injured
पालघरमध्ये गोळीबार, २ जखमी 

थोडं पण कामाचं

  • पालघरमध्ये गोळीबार, २ जखमी
  • पालघर जिल्ह्यात नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले
  • पालघर जिल्ह्यात साधू हत्याकांड

पालघर: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका बारच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हल्लेखोरांनी गोळीबार केला तसेच धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात २ जण जखमी झाले. जखमींपैकी एका व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी झालेल्या दोघांनाही गोळी लागली. (firing in palghar two injured)

गोळीबाराची घटना काल रात्री (रविवार, १४ फेब्रुवारी २०२१) साडेनऊच्या सुमारास घडली. तीन हल्लेखोरांनी दोन जणांवर जोरदार हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळीबार केला तसेच धारदार शस्त्राने वार केले. हल्लेखोरांकडून चार राउंड गोळीबार करण्यात आला. जखमी झालेल्या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ल्याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जाणार आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथेही सखोल चौकशी सुरू आहे. लवकरच हल्लेखोरांना अटक करू, असे पोलिसांनी सांगितले. तुळींज पोलीस ठाण्याचे प्रमुख राजेंद्र कांबळे आणि त्यांचे सहकारी तपास करत आहेत. 

पालघर जिल्ह्यात नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले

काही दिवसांपूर्वी एका नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करुन त्याला जिवंत जाळल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यात घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नौदल अधिकाऱ्याचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणात तपास करत आहेत. 

नौदल अधिकाऱ्याचे नाव सुरज कुमार दुबे (२७ वर्षे) असे असल्याची माहिती समोर आली आहे. हा अधिकारी झारखंडचा निवासी होता. अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सुरज कुमार दुबे यांचे चेन्नई विमानतळाजवळून अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तीन दिवसांपर्यंत सुरज कुमार दुबे यांना अज्ञातस्थळी ठेवले होते. आरोपींनी नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांकडून १० लाखांची खंडणी मागितली. मात्र पैसे न मिळाल्याने आरोपींनी सुरज कुमार दुबे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जंगलात शरीरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले.

जिवंत जाळल्याने सुरज कुमार दुबे हे गंभीर जखमी झाले. एका स्थानिक नागरिकाने सुरज कुमार यांना जंगलात पाहिले आणि त्याची माहिती घोलवड पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुरज कुमार यांना तात्काळ डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथेच सुरज कुमार यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. ही घटना याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत घडली.

पालघर जिल्ह्यात साधू हत्याकांड

याआधी मागच्या वर्षी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाकडून मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचे सदस्य समजून समजून दोन साधू आणि एका कारच्या चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या साधू हत्याकांड प्रकरणी क्राइम ब्रँचने सीआयडी डहाणू कोर्ट येथे ४५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात ११ अल्पवयीन आरोपींसह १६९ आरोपींवर आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन झाले असून ३०पेक्षा जास्त पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. सध्या बहुसंख्य आरोपी जामिनावर आहेत. 

पालघर जिल्ह्यातून एटीएमच्या रोख रकमेची चोरी

पालघर जिल्ह्यात सातत्याने मोठे गुन्हे घडत आहेत. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एटीएमच्या सुमारे साडेचार कोटींच्या रोख रकमेसह वाहन चालकाने पळ काढल्याची घटनाही पालघर जिल्ह्यातच घडली होती. पालघर जिल्ह्यातील विरारच्या बोळींज परिसरातून रोख रकमेसह वाहन चालकाने पळ काढला होता. पण रक्कम मोठी असल्यामुळे चालकाला पैसे दीर्घकाळ लपवणे कठीण झाले. काही दिवसांतच पोलिसांनी चालकाला अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी