Bhau kadam in Fish curry rice । ठाणे : पुण्यातील यशानंतर आता ऑथेंटिक गोवन कारवारी सी फूडची चैन असलेले 'फिश करी राईस' हे रेस्टॉरंट आता ठाण्यात सुरू झाले आहे. पुण्यात अनेक सेलिब्रिटीचे आवडते ठिकाण असलेली या रेस्टॉरंटची ठाण्याची शाखा आता अनेक मराठी सेलिब्रिटींचा नवा कट्टा झाला आहे. नुकतेच मराठीतील हास्यसम्राट भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी या रेस्टॉरंटला भेट दिली आणि सी फूडवर यथेच्छ ताव मारला.
सुयोग नाट्य संस्थेचे सुधीर भट यांनी या फिश करी राईस रेस्टॉरंटची सुरूवात २००९ मध्ये पुण्यात केली. त्याची पहिली शाखा ही नारायण पेठेत सुरू केली. आता पुण्यात कोथरूड, बाणेर, टिळक रोड, विमाननगर येथही खवय्यांना मेजवानी देत आहेत. आता मुंबई परिसरातील पहिली शाखा ठाण्यात उघडण्याचा मान संयोग मतकरी यांना मिळाला आहे. या रेस्टॉरंटमध्ये अत्यंत ऑथेंटिक गोवन कारवारी सी फूड ग्राहकांना देण्यात मतकरी यांना नेहमीच आनंद होतो.
Also Read : १० वर्षाच्या मुलीने सूरू केला व्यवसाय, एका महिन्यात कोट्यवधींची कमाई
Also Read : विमान प्रवासावर पेटीएमची ५० टक्क्यांची सूट, असा घ्या फायदा
'पांडू' चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतेच 'फिश करी राईस' रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी भाऊ कदम याने सुरमयी थाळीचा आस्वाद घेतला. या चित्रपटाचे डायरेक्टर विजू माने यांनी क्रॅब (खेकडा) थाळीचा आस्वाद घेतला. कुशल बद्रीकने पापलेट थाळी संपवली. तृप्त झालेल्या भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि विजय माने यांनी या सी फूडचे भरभरून कौतुक केले.
भाऊ कदम यांनी या रेस्टॉरंटला एकदा नाही दोनदा भेट दिली आहे. त्याला येथील चव इतकी आवडली की सुरूवातीला तो कुशलला घेऊन आला. त्यांनी येथील खाण्याची इतकी प्रशंसा केली की पांडू चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या सोनाली कुलकर्णीला राहवले नाही आणि ती पुन्हा भाऊ आणि विजू माने यांना घेऊन फिश करी राईस रेस्टॉरंटमध्ये आली. तिनेही येथे पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.
या रेस्टॉरंटचे वैशिष्ट म्हणजे गोवन कारवारी सी फूडची अस्सल चव खवय्यांना चाखाला मिळणार आहे. तसेच सी फूड शिवाय या ठिकाणी मटण थाळी, चिकन थाळी आणि व्हेज थाळीचाही आस्वाद घेता येणार आहे. फिश करी राईसचे खास डिशेज बोंबिलचा ठेचा, कोळंबी आलूवडी, पॉपलेट पेडावन, भरलेला बांगडा या सांगता येतील. ज्याला सी फूड आवडते त्याच्यासाठी हे पदार्थ एकूणच पर्वणी आहे. या रेस्टॉरंटमधील मासे अत्यंत ताजे असतात. त्यात पॉम्पलेट, सुरमई, रावस, मोरी, बांगडा, कोळंबी, खेकडे, तिसऱ्या यांचा समावेश आहे.
गरमा गरम आणि झणझणीत रश्यासोबत भाकरी, वडे तुमची भूक अजूनच वाढवते. येथील विशेष म्हणजे तिवल हे येथील वेलकम ड्रिंक आहे. तर वाट काय पाहता ठाणेकर, येथील वर्ण ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटले असले तर ठाण्यातील सेलिब्रिटींचा नवा कट्टा पाहण्यासाठी आणि तेथील पदार्थांवर ताव मारण्यासाठी आज या रेस्टॉरंटला भेट द्या. कोण जाणे एखादा सेलीब्रिटी त्या ठिकाणी सी फूडचा आस्वाद घेत असेल आणि तुमच्या सेल्फी मूव्हमेंट होऊन जाईल.
ठाण्यातील फिश करी राइस या शाखेचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, फूड क्रिटिक्स कुणाल विजयकर आणि अभिनेते विनय येडेकर यांच्या हस्ते झाले.
आता तुम्ही म्हणाल फिश करी राईस या ठिकाणी कसे जायचे तर ठाणे घोडबंदर रोडवर मानपाडा येथे दोस्ती एम्पेरिया येथे भगत ताराचंद शेजारी शॉप नंबर ७ या ठिकाणी ही शाखा आहे. तर भेट द्या आणि आम्ही हे ठिकाणी सूचवलं म्हणून आम्हांला कमेंट सांगा तुम्हांला कसे वाटले.