Five People Drowned : ठाणे :राज्यात आणि देशातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परंतु ही पाणी टंचाई आता सामान्य नागरिकांच्या जिवावर बेतली आहे. डोंबिवलीत एकाच कुटुंबीयांतील पाच जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील संदप गावात पाणी टंचाई होती. गावात पाणी नसल्याने एका कुंटुंबीयातील काही महिला तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते. तेव्हा कुंटुबातील एक मुलगा तलवात पडला. त्याला वाचवण्यासाठी एका पाठोपाठ पाच जणांनी पाण्यात उडी मारली आणि पाचही जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये मीरा गायकवाड (५५), त्यांची सून, अपेक्षा (३०), नातू मयुरेश, (१५), मोक्ष (१३), निलेश (१५) अशी त्यांची नावे आहेत.
Maharashtra | Five people of a family drowned in a quarry in a village near Dombivli in Kalyan Gramin in Thane district, yesterday. They went there to fetch water pic.twitter.com/xDlnQQNQV5
— ANI (@ANI) May 8, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका एक महिला आणि तिची सून तलावाकाठी कपडे धूत होती. तेव्हा एक मुलगा घसरून या तलावात पडला आणि तो बुडायला लागला. तेव्हा कुटुंबातील इतर चार सदस्य त्याला वाचवायला गेले आणि त्यातच त्यांचाही बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबीयांतील ५ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.