शिवसेनेचे ठाणे, कोकणात मुलांसाठी वैद्यकीय शिबीर

बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ठाण्याचे ज्युपिटर हॉस्पिटल यांनी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.

free medical camp organised by shivsena
शिवसेनेचे ठाणे, कोकणात मुलांसाठी वैद्यकीय शिबीर 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेचे ठाणे, कोकणात मुलांसाठी वैद्यकीय शिबीर
  • लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी, मोफत हृदय शस्त्रक्रिया
  • जन्मापासून हृदयाला छिद्र असलेल्या १३०पेक्षा जास्त मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया

ठाणे: बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ठाण्याचे ज्युपिटर हॉस्पिटल यांनी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. यात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी, मोफत हृदय शस्त्रक्रिया सुरू आहे. जन्मापासून हृदयाला छिद्र असलेल्या १३०पेक्षा जास्त मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. (free medical camp organised by shivsena)

खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ४ फेब्रुवारी आणि राज्याचे नगरविकासमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी असतो. या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात मुलांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय उपचारांसाठी शिबिरात सहभागी झालेल्या मुलांच्या हातून केक कापून शिंदे पिता-पुत्र यांनी वाढदिवस साजरा केला.

कोरोना संकटाचे भान ठेवून कोविड प्रोटोकॉलचे पालन करत वैद्यकीय उपचार करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपचार करणारी संपूर्ण मेडिकल टीम पीपीई किट घालून मुलांवर वैद्यकीय उपचार करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महाराष्ट्रात पेन ड्राइव्ह ठेवण्यासाठी ५८.८२ लाखांची बॅग खरेदी

महाराष्ट्रात ३५ हजार ९१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३५ हजार ९१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील २० लाख ४८ हजार ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १९ लाख ६१ हजार ५२५ जण कोरोनामुक्त झाले. कोरोना झालेल्यांपैकी ५१ हजार ३६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचा कोरोनामुक्तीचा दर (रिकव्हरी रेट) ९६ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्य दर २.५ टक्के आणि कोरोना अॅक्टिव्ह केसचा दर (रुग्ण) १.८ टक्के आहे. 

सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत दुसऱ्या स्थानी

देशात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आहे. देशात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये ६४ हजार ३९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळचा कोरोना अॅक्टिव्ह केसचा दर (रुग्ण) ६.६ टक्के आहे. 

भारतात १ लाख ४१ हजार ५११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

ताज्या आकडेवारीनुसार भारतात १ लाख ४१ हजार ५११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ६४ हजार ३९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण केरळमध्ये आणि ३५ हजार ९१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे मिळून १ लाख ३०७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात ६५ लाख २८ हजार २१० जणांना दिली कोरोना प्रतिबंधक लस

भारतात आतापर्यंत ६५ लाख २८ हजार २१० जणांना कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस देण्यात आला. देशात ९ फेब्रुवारी रोजी एका दिवसांत २ लाख ६९ हजार २०२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस देण्यात आला. भारतात १३ फेब्रुवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस देण्यास सुरुवात होणार आहे. तसेच मार्च महिन्यापासून देशातील ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नियोजन सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी