Dombivali Crime news । डोंबिवली : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मानपाडा पोलिसानी त्रिकुटाला बेड्या ठोकल्यात . या टोळीकडून पोलिसांनी 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा 20 किलो गांजा हस्तगत केला आहे. आनंद देवकर ,रेहमल पावरा ,संदीप पावरा अशी या तिघांनी नावे असून आनंद देवकर हा या टोळीचा म्होरक्या होता.
या प्रकरणी आज कल्याण न्यायालयात तिघांना हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांना एक व्यक्ती गांजा घेऊन शिवम हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती .या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी या आरोपीला पकडण्यासाठी एक पथक नेमले. या पथकाने शिवम हॉटेल परिसरात सापळा रचला.
एक तरुण दोन पोती घेऊन त्या परिसरात आला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील त्या पोत्यात 20 किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी आनंद देवकर या तरुणाला अटक केली. आनंद देवकर हा डोंबिवतील शिवमंदीराजवळ राहतो.
अधिक वाचा : कोरोनाच्या 11 महिन्यात राज्यातील 2489 शेतकऱ्यांची आत्महत्या
पोलीसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला. आनंद देवकर हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून हा गांजा घेऊन आल्याचे तपासात समोर आले . पोलिसांचे पथक शिरपूरला रवाना झाले. आनंदला गांजा देणारा रेहमल पावरा आणि संदीप पावरा हे दोघे असल्याची माहिती मिळताच या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी या तिघाना अटक केली असून या तिघांना पोलिसानी कोर्टात हजर केले असता कोर्टाने या तिघांना 31 जानेवारीर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी धुळे जिल्ह्यातून आनंद हा गांजा घेऊन डोंबिवलीत येतो. हा गांजा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकतो. पोलिस गांजा खरेदी करणाऱ्या तरुणांचीही चौकशी करणार आहेत. अशा प्रकारे अंमली पदार्थांची विक्री ,वाहतूक साठा करणाऱ्या इसमांची माहिती मिळताच तत्काळ पोलिसाना माहिती द्यावी असे आवाहन केले.