Gas Cylinder Exploded In A House In Dombivli : डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगरमधील देवीचा पाडा येथे सिलेंडर स्फोट झाला. या सिलेंडर स्फोटात ६५ वर्षांचे हनुमंत मोरे जखमी झाले. जखमी झालेले हनुमंत मोरे यांना उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १५५२५ कोरोना Active, आज २१८६ रुग्ण, ३ मृत्यू
कल्याण स्टेशनवर होतो रेल्वेच्या फ्री वायफायचा सर्वाधिक वापर
Dombivli Crime: वाहतूक पोलिसाला कार चालकाने फरफटत नेलं, डोंबिवलीतील घटनेचा LIVE VIDEO
पहाटे उठून आंघोळ करून सवयीप्रमाणे पूजेसाठी उदबत्ती पेटविण्यासाठी हनुमंत मोरे यांनी लायटर पेटवला. पण लायटर पेटवताच घरातील सिलेंडरचा स्फोट झाला आणि हनुमंत मोरे जखमी झाले. गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुर्घटनेत हनुमंत मोरे सुमारे चाळीस टक्के भाजले आहेत.
स्फोटाचा आवाज येताच शेजारी घटनास्थळी आले त्यांनी हनुमंत मोरे यांच्या मुलाला आणि पोलिसांना घटनेची माहिती कळविली. मुलाने घटनास्थळी येऊन वडिलांना तातडीने मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नेले. सध्या मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये हनुमंत मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सिलेंडर स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की हनुमंत मोरे ज्या घराता राहात होते त्या घराचे प्रचंड नुकसान झाले. स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले. स्वयंपाकघरातील बहुतांश सामान जळून खाक झाले. या प्रकरणात विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत.