इमारतीवरुन उडी मारत तरुणीची आत्महत्या; मैत्रिणीच्या मदतीने सात आरोपींकडून दीड वर्ष पीडितेवर लैंगिक अत्याचार

ठाणे
भरत जाधव
Updated Jun 16, 2022 | 08:45 IST

एका जीवलग मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीचे आयुष्य उद्धवस्त केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पूर्वेला (Kalyan East) राहणाऱ्या एका तरुणीने राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 12 वीमध्ये चांगले टक्के गुण पाडून सुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांना पडला होता.

Sexual abuse on a young woman for a year and a half
मैत्रिणीने केला घात; तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पीडिता कल्याण पूर्वमध्ये राहत होती.
  • पीडितेची मैत्रिण आरोपींना लैंगिक अत्याचारात मदत करत होती.
  • दोन दिवसापूर्वीच तरुणी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली

कल्याण :  एका जीवलग मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीचे आयुष्य उद्धवस्त केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पूर्वेला (Kalyan East) राहणाऱ्या एका तरुणीने राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 12 वीमध्ये चांगले टक्के गुण पाडून सुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर शोधताना पोलिसांच्या हाताला मुलीचा  मोबाईल लागला अन् त्यातील सुसाईड नोटने आरोपींसह आत्महत्येचे कारण देखील समोर आले. 

मुलीच्या मोबाईलमधील सुसाईड नोटच्या आधारे तपास करत कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती.  मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व परिसरात एका पीडित तरुणी राहत होती. अभ्यासातही चांगली असून बारावीच्या परीक्षेत तिला 71 टक्के मार्क्स आले होते,परंतु दोन दिवसांपूर्वी तिने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. चांगले मार्क मिळाले तरी आत्महत्या का केली या प्रश्नाचं उत्तर शोधताना पोलिसांनी ही धक्कादायक माहिती मिळाली. 

लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Kalyan Suicide Case) केली. या तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून सात तरुण लैंगिक अत्याचार करत होते. विशेष म्हणजे या तरुणीवर लैंगिक अत्याचार होण्यामागे तिचीच मैत्रिण होती.  आरोपी तरुण पीडित तरुणीला लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत तिच्यावर सतत अत्याचार करत होते. पीडितेची मैत्रिण आरोपींना त्या कामात मदत करत होती. या त्रासालाच कंटाळून तिने दोन दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी (Kolasewadi Police) आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी काही जण हे कल्याणमधील नामांकित बिल्डरची मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या कुटुंबीयांकडून आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे बहीण-भाऊ आहेत. काजल जयस्वाल ही पीडितेची चांगली मैत्रीण होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी