महाराष्ट्र शासनाने केडीएमसीचे थकवलेले पैसे द्यावे : संदीप देशपांडे

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Jun 04, 2022 | 09:41 IST

Government of Maharashtra should pay the arrears of KDMC says MNS leader Sandeep Deshpande : हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावी. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शासनाकडून येणे असलेली महापालिकेची थकबाकी द्यावी जेणेकरून कामगारांचे पैसे मिळतील, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कल्याणमध्ये केली. 

Government of Maharashtra should pay the arrears of KDMC says MNS leader Sandeep Deshpande
महाराष्ट्र शासनाने केडीएमसीचे थकवलेले पैसे द्यावे : संदीप देशपांडे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र शासनाने केडीएमसीचे थकवलेले पैसे द्यावे : संदीप देशपांडे
  • मनसेने केडीएमसीवर नेला कंत्राटी कामगारांचा मोर्चा
  • धर्मवीर सिनेमात एकनाथ शिंदेंनी स्वतःचे कॅरेक्टर घुसवले : संदीप देशपांडे

Government of Maharashtra should pay the arrears of KDMC says MNS leader Sandeep Deshpande : कल्याण : हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावी. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शासनाकडून येणे असलेली महापालिकेची थकबाकी द्यावी जेणेकरून कामगारांचे पैसे मिळतील, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कल्याणमध्ये केली. 

मनसे नेते देशपांडे केडीएमसी मुख्यालयावर मनसेतर्फे कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात उपस्थित होते. कामगारांच्या मागण्या त्यांनी महापालिका प्रशासनासमोर मांडल्या. केडीएमसीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन, कोव्हिड भत्ता आणि विमा संरक्षणाचे पैसे अदा करावेत या मागण्यासाठी मनसेतर्फे कल्याण पश्चिम येथील सुभाष मैदान ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित होते. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी भेट घेतली. अतिरिक्त आयुक्तांनी या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

केडीएमसी महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे त्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती मनसेच्या संदीप देशपांडेंनी केली. हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावी. पालकमंत्र्यांनी शासनाकडून केडीएमसीला येणे असलेली रक्कम लवकर मिळवून द्यावी; अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडेंनी केली.

धर्मवीर सिनेमात नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत दाखवण्यात आलेल्या प्रसंगाबद्दल देशपांडे यांनी पालकमंत्री शिंदे यांना टोला लगावल . नसलेले कॅरेक्टर सिनेमात घुसवले आहे. दिघे साहेब असताना एकनाथ शिंदे कुठेच नव्हते, असे संदीप देशपांडे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी