हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, वाशीत सिग्नल यंत्रणेत बिघाड

ठाणे
रोहन जुवेकर
Updated May 04, 2022 | 08:15 IST

Harbor train service disrupted, signal system failure in Vashi : वाशी येथे पहाटे पाचच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन्ही मार्गांवरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Harbor train service disrupted, signal system failure in Vashi
हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, वाशीत सिग्नल यंत्रणेत बिघाड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, वाशीत सिग्नल यंत्रणेत बिघाड
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन्ही मार्गांवरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • सकाळी ६.२५ नंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात

Harbor train service disrupted, signal system failure in Vashi : नवी मुंबई : वाशी येथे पहाटे पाचच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन्ही मार्गांवरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळीच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाकरिता रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले. गाड्या पाच ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. काही गाड्या रद्द करण्यात आल्या. 

SECR Recruitment 2022 : रेल्वे भरती : आयटीआय झालेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

डाऊन मार्गावर मानखुर्द ते पनवेल दरम्यान तसेच ठाणे ते वाशी दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प होती. सकाळी ६.२५ नंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. सकाळी ६.४५ नंतर ठप्प झालेली मानखुर्द ते पनवेल आणि ठाणे ते वाशी ही वाहतूक सुरू झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी