ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्सहार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत

ठाणे
Updated Apr 20, 2019 | 12:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Mumbai local train
मुंबई लोकल ट्रेन (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

ठाणे: ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं वृत्त समोर येत आहे. तुर्भे आणि वाशी रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी आणि ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या वेळी नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी घाई असते आणि त्यातच रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं दिसत आहे.

ओव्हरहेड तुलट्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र, हे कामं नेमकं कधी पूर्ण होईल आणि आणखीन किती वेळ लागेल या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये.

कार्यालात जाण्यासाठी उशिर होत असल्याने अनेक जणांनी थेट रुळावरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी बस, रिक्षा मिळेल ते वाहन पकडून कार्यालयात जाण्यास सुरूवात केली आहे.

पूर्वा एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले

तर तिकडे उत्तरप्रदेशातील कानपूर येथे पूर्वा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले आहेत. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, पोलीस, एनडीआरएफचं पथक दाखल झालं. तर, जखमींना उपचाराकरीता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्सहार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत Description: ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Loading...
Loading...
Loading...