Kalyan Dombivale Rain : कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस, डोंबिवलीच्या नांदिवली भागात साचले पाणी

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Jul 04, 2022 | 20:38 IST

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवलीतही मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यात मोठी अडचण होत आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
  • त्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवलीतही मुसळधार पाऊस झाला आहे.
  • या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यात मोठी अडचण होत आहे.

Kalyan Dombivali Rain : ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील (Thane District) कल्याण  आणि डोंबिवलीतही (Kalyan and Domnbivali) मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यात मोठी अडचण होत आहे. (heavy rain at kalyan dombivali area waterlogging in so many area)


गेल्या महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू होता. मात्र आज दुपार पासूनच कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सोमवार सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू होती. तर दुपार पासून पावसाने जोर धरला होता. तर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही डोंबिवली मधील नांदिवली भागात पाणी सायले होते. सायंकाळी घरी परतत असलेल्या शाळेतील विद्यार्थी व चाकरमान्यांना पाण्यातून मार्ग काढत घरी परतावे लागले. कल्याणमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. कल्याणमधील स्थानक परिसर आणि छाया टॉकीज येथेही पाणी साचले आहे. या थोड्याच्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पुढील पावसाळ्यात आणखी काय होईल असा प्रश्नही सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी