जीवदानी मातेच्या दर्शनासाठी 'हेलिकॉप्टर यात्रा'

helicopter facility for devotees to visit virar jivdani temple जीवदानी मातेच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर यात्रेचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

helicopter facility for devotees to visit virar jivdani temple
जीवदानी मातेच्या दर्शनासाठी 'हेलिकॉप्टर यात्रा' 

थोडं पण कामाचं

  • जीवदानी मातेच्या दर्शनासाठी 'हेलिकॉप्टर यात्रा'
  • वसई-विरार परिसरात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर राइड
  • शनिवार आणि रविवार या दोन दिवशी उपलब्ध

विरार: पालघर जिल्ह्यातील विरार येथे असलेले जीवदानी मातेचे मंदिर (https://jivdanidevi.com/) लोकप्रिय आहे. या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. श्रद्धेने जीवदानी मातेला नवस बोलणाऱ्या आणि नवस फेडण्याच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. आता जीवदानी मातेच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर यात्रेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. (helicopter facility for devotees to visit virar jivdani temple)

वसई-विरार परिसरात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर राइड हा पर्याय उपलब्ध झाला आहे. पुण्याच्या वरद एव्हिएशन कंपनीने जीवदानी मातेच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर यात्रेचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार आहे. यानंतर जीवदानी मातेच्या मंदिराचे हेलिकॉप्टरमधून हवाई दर्शन घेणे शक्य होणार आहे. या निमित्ताने नागरिकांना विरारच्या निवडक भागांची हवाई सफर करण्याची संधी मिळणार आहे.

हेलिकॉप्टर सेवेची माहिती आणि दर जाणून घेण्यासाठी थेट वरद एव्हिएशन कंपनीशी (http://varadaviation.com/) संपर्क साधता येईल. हेलिकॉप्टर सेवा फक्त शनिवार आणि रविवार या दोन दिवशी उपलब्ध असेल. विरारच्या जीवदानी मातेच्या दर्शनासाठी भाविक फनीक्युलर ट्रेन (Funicular train) या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तसेच जीवदानी मातेच्या मंदिराचे हवाई दर्शन आणि विरारच्या निवडक भागांची हवाई सफर करण्यासाठी हेलिकॉप्टर यात्रेचा पर्याय उपलब्ध आहे. लवकरच विरारमधून शिर्डी, वणी, मुंबई आणि इतर ठिकाणांसाठी हवाई सफरीचा पर्याय वरद एव्हिएशन कंपनी उपलब्ध करुन देणार आहे. कोरोना संकटाचे भान ठेवून कोविड प्रोटोकॉलचे पालन करत हेलिकॉप्टर यात्रा करता येणार आहे.

मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा

रुग्ण संख्या वाढत असली तरी मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही, असे महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. मुंबई लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील, लोकल बंद करून लोकांची गैरसोय सरकारला करायची नाही आहे,  असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी