KALYAN | डोंबिवलीतील धक्कादायक घटना, दुकानात घुसून ज्वेलर्सवर चाकूने हल्ला 

Dombivali crime news । एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून अज्ञात इसमाने ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोर हा तोंडावर मास्क घातलेला होता ,हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

In a shocking incident in Dombivali, a shop owner was attacked with a knife
डोंबिवलीतील घटना, दुकानात घुसून ज्वेलर्सवर चाकूने हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून अज्ञात इसमाने ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली.
  • अज्ञात हल्लेखोर हा तोंडावर मास्क घातलेला होता ,हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे
  • या हल्ल्यात दुकान मालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हल्लेखोर पसार झाला आहे.

डोंबिवली :   एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून अज्ञात इसमाने ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोर हा तोंडावर मास्क घातलेला होता ,हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (In a shocking incident in Dombivali, a shop owner was attacked with a knife)

या हल्ल्यात दुकान मालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हल्लेखोर पसार झाला आहे.  याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. 

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय वर्तविण्यात येत असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत मात्र पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. 

  डोंबिवलीतील आगरकर रोडवर मन्ना तारकनाथ यांचे मन्ना ज्वेलर्स नावाने दुकान आहे .काल दुपारच्या सुमारास मन्ना आपल्या दुकानात होते याच दरम्यान एक अज्ञात इसम दुकानात आला या इसमाने चेहरा झाकलेला होता . त्याने मन्ना यांना चाकूचा धाक दाखवला.
  
  घाबरलेल्या मन्ना यांनी प्रतिकार केला असता त्याने चाकूने मन्ना यांच्यावर हल्ला केला. मन्ना जखमी होताच हल्लेखोर तिथून पसार झाला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
  
  या हल्ल्यात मन्ना याना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे . अद्याप हल्ल्याचे  कारण स्पष्ट झाले नसले तरी पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी याबाबत आरोपीला लवकर अटक करून सांगितलं  मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी