Jitendra AWhad । जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आमदाराची काढली अक्कल 

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Jan 12, 2022 | 13:57 IST

Jitendra Awhad vs Shiv Sena : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साताऱ्याचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेवरून केलेल्या टीकेमुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड खूपच संतापले आहेत. त्यांनी महेश शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांची अक्कल काढली आहे. 

Jitendra Awhad attacks Shiv Sena MLA MAHESH sHINDE POLITICAL NEWS IN MARATHI
जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आमदाराची काढली अक्कल  
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साताऱ्याचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेवरून केलेल्या टीकेमुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड खूपच संतापले आहेत.
  • महेश शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांची अक्कल काढली आहे.
  • या संदर्भात एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी जारी केला आहे.

JItendra AWhad Attack on Sena MLA । मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साताऱ्याचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेवरून केलेल्या टीकेमुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड खूपच संतापले आहेत. त्यांनी महेश शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांची अक्कल काढली आहे. (Jitendra Awhad attacks Shiv Sena MLA MAHESH sHINDE POLITICAL NEWS IN MARATHI )

Also Read : 'रयत'च्या अध्यक्षपदावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार आमने-सामने

या संदर्भात एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी जारी केला आहे. ते म्हणाले, सध्या शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे दिवसभर टीव्ही चॅनलवर झळकता येते किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून कोणीही काहीही करू लागले आहे. कोण कुठल्या गावचा महेश शिंदे हा पवार साहेबांवर टीका करत आहे. 

या महेश शिंदे यांची गौरीशंकर नावाची शिक्षण संस्था आहे. त्यातील क्लार्कचा शिक्षकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फीचा काय आहे ते माहिती नाही. तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचं काय झालं. शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते, अशा शब्दांत आव्हाड यांनी महेश शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

Also Read : ​पुण्यात भाजपमध्ये खिंडार, 18 नगरसेवकांना एनसीपीचा लळा

शरद पवार साहेबांच्या उंची पेक्षा फक्त दोन इंच कमी आहे असे वक्तव्य महेश शिंदे यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना आव्हाड म्हणाले, की शरद पवार हे उंचीने नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने ओळखले जाते. त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे, त्यासमोर आपले कर्तृत्व किती आहे हे कधीतरी तपासा , असा सल्लाही आव्हाड यांनी यावेळी दिला आहे. 

महेश शिंदेना इशारा देत आव्हाड म्हणाले, स्वतःची लाज स्वतःच्या हाताने घालवू नका, तुम्ही उंचीने किती आहात याबद्दल माझा प्रश्न नाही. पण तुमचा मेंदू ठिकाणावर आहे का हे तपास असेही आव्हाड म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी