AC Local : ठाणे : गर्दीच्या वेळी नेहमीच्या लोकल ऐवजी एसी लोकल चालवणे हे सर्वसामान्य प्रवाशांना मान्य नाही म्हणून गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवू नका अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवल्यास आंदोलन करू असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
ED ची नजर आता पवार कुटुंबियांवर, आमदार रोहित पवार आता रडारवर
काही दिवसांपूर्वी कळवा स्थानकात प्रवाशांनी एसी लोकल तब्बल पाऊण तास रोखून ठेवली होती, एसी लोकलने प्रवास करणारे प्रवासी कमी आहेत म्हणून नेहमीच्या लोकल सोडाव्यात अशी मागणी या प्रवाशांनी केली होती. यावरून कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आव्हाड म्हणाले की, प्रवाशांच्या आंदोलनांतर रेल्वेने काही एसी गाड्या रद्द केल्या आहेत. मात्र गर्दीच्या काळात एसी गाड्या चालवणे आम्हाला मान्य नाही. गर्दीच्या काळात या एसी गाड्या रद्द करण्यात याव्या एवढीच आमची मागणी आहे. आमची मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य नाही केली तर मोठ्या प्रमाणात रेलरोको करू. भविष्यात प्रत्येक रेल्वे स्टेशन वर हजारोंच्या संख्येने हे आंदोलन छेडले जाईल आणि त्याला कोणी अडवू शकणार नाही असा इशाराही आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.
आव्हाड म्हणाले की, समस्त रेल्वे प्रवाशांचे एकच मत आहे ते म्हणजे गर्दीच्या वेळी एसी लोकल असताच कामा नये. नेहमीच्या लोकल बाजूला काढून त्यांच्या जागी एसी लोकल चालवणे हे आमच्या सर्वसामान्य प्रवाशांना मान्य नाही. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात दुपारच्या बारा वाजता देखील एवढे मध्यमवर्गीय एक ठिकाणी जमणे हा रेल्वेला आणि महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला धोक्याचा इशारा आहे. याचा अर्थ लोकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि या रागाची ऊर्जा या आंदोलनात उतरेल. भविष्यात असे आंदोलन झाले तर होणारे आंदोलन कोणाच्या हातात राहणार नसल्याचे आव्हाडांनी सांगितले. जर रेल्वे प्रशासन सर्वसामान्यांचं ऐकणार नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्यकडे आंदोलन हा एकच पर्याय आहे. आंदोलनाची तलवार काढावीच लागेल असेही आव्हाडांनी नमूद केले.
अधिक वाचा : दिवसभर भूक लागते?, मग Craving कमी करण्यासाठी खा या 5 गोष्टी