Kalyan station has the highest usage of free wifi of railways : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर विनामूल्य वायफाय सेवा वापरता येते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने ही सुविधा उपलब्ध केली आहे. मध्य रेल्वे मार्गावर वायफायचा सर्वाधिक वापर कल्याण स्टेशनवर होतो.
कल्याण रेल्वे स्टेशनवर मे २०२२ मध्ये पंधरा हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी फ्री वायफायचा वापर केला. फ्री वायफायद्वारे प्रवाशांनी ४ हजार ९४३ गिगाबाईट्स डेटा वापर वापरला. मे २०२२ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वेच्या फ्री वायफायचा सर्वाधिक वापर करणाऱ्या स्टेशनांच्या यादीत कल्याणचा पहिला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (सीएसएमटी) दुसरा, ठाणे स्टेशनचा तिसरा आणि बोरिवली स्टेशनचा चौथा क्रमांक लागला.
वायफायद्वारे माहिती मिळवणे, व्हिडीओ बघणे, ऑडिओ ऐकणे शक्य आहे. प्रवासी ताजी माहिती मिळवण्यासाठी अथवा ज्ञानात भर पडावी म्हणून किंवा मनोरंजनासाठी वायफाय वापरू शकतात. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी देशातील अनेक स्टेशनवर फ्री वायफाय सेवा सुरू केली आहे.
रेलटेलने दिलेल्या माहितीनुसार मे २०२२ मध्ये कल्याण स्टेशनवर फ्री वायफायद्वारे १५ हजार ११५ प्रवाशांनी ४ हजार ९४३ गिगाबाईट्स डेटा वापर वापरला. मे २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) सहा ७८८ प्रवाशांनी फ्री वायफायचा वापर केला.
प्रवाशांना मार्च २०२१ पासून वायफायसाठी शुल्क आकारण्यास सुरूवात झाली. वायफायचा ३० मिनिटे विनामूल्य वापर करता येतो. यानंतर वायफाय वापरण्यासाठी पैसे भरावे लागतात.