Shocking!, दिला नाही मोबाईलच्या Hotspot चा पासवर्ड, गमवावा लागला जीव

Crime News : नवी मुंबईत दोन तरुणांनी एक अल्पवयीन मुलाचा भररस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना घडली. कामोठे परिसरात सोमवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली.

Killing of minors on the rampage in Kamothe
Shocking!, दिला नाही मोबाईलच्या Hotspot चा पासवर्ड, गमवावा लागला जीव ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टरनेट पासवर्ड देण्यास नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून
  • भररस्त्यात गाठून पाठीत चाकूने खूपसला
  • दोन्हीही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत सोमवारी रात्री एक एक धक्कादायक घडली. दोन तरुणांनी मोबाईल डेटासाठी हाॅटस्पाॅटचा पासवर्ड न दिल्याने एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे कामोठे परिसरात खळबळ उडाली आहे. (Killing of minors on the rampage in Kamothe)

अधिक वाचा : Jalna : स्टील कारखान्यात बाॅयलरचा स्फोट; 10 कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीररित्या जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आरोपी रवींद्र हरीयानी आणि राज वाल्मिकी हे कामोठे  येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. या दोघांनी विशाल मौर्य (वय 17) या अल्पवयीन मुलाला इंटरनेट वापरण्यासाठी वायफायचा पासवर्ड मागितला, मात्र त्या मुलाने पासवर्ड शेअर करण्यास नकार दिला. म्हणून या दोन्ही आरोपींनी विशालचा भररस्त्यात खून केला.

अधिक वाचा : “ पुन्हा आमच्या वाट्याला गेलात, तर…”, बच्चू कडू यांनी दिला रवी राणांना इशारा

कामोठे परिसरातल्या सेक्टर 14 येथील विशाल मौर्य हा बेकरी मध्ये काम करतो. सोमवारी रात्री तो रात्री काम आटोपून टपरीवर नेहमीप्रमाणे पान खाण्यासाठी गेला. तिथे आपल्याच ओळखीचे रवींद्र हरीयानी आणि राज वाल्मिकी उभे होते. त्यांनी आपल्याकडचा मोबाईल डाटा संपला म्हणून मयत विशाल मौर्य याच्याकडून इंटरनेट कनेक्टसाठी मोबाईल पासवर्ड मागितला. मात्र ते देण्यास विशालने नकार दिला, यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याच रागातून दोघांनी आधी त्याला लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. पान टपरीवाल्याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी राज याने आपल्या जवळ असलेल्या चाकू विशालच्या पाठीत खुपसला आणि तेथून पळ काढला. त्यात राजकुमार मौर्य गंभीर जखमी झाला असल्याने त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कामोठे पोलिसांनी दोन्हीही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याबाबत उपायुक्त विवेक पानसरे यांनी अधिक माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी