Dharmveer Sequel  : दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार? 2024 ला येणार धर्मवीरचा पार्ट -2

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Nov 03, 2022 | 08:24 IST

Dharmveer Sequel : काही महिन्यांपूर्वी ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर बायोपिक आला होता. त्यात प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. मंगेश देसाई यांनी धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता निर्माते देसाई यांनी धर्मवीरचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडतील अशी माहिती देसाई यांनी दिली.

dharmaveer sequel 1
धर्मवीरचा दुसरा भाग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • निर्माते देसाई यांनी धर्मवीरचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली आहे.
  • या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडतील अशी माहिती देसाई यांनी दिली.
  • 2024 साली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Dharmveer Sequel : ठाणे : काही महिन्यांपूर्वी ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर बायोपिक आला होता. त्यात प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. मंगेश देसाई यांनी धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता निर्माते देसाई यांनी धर्मवीरचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडतील अशी माहिती देसाई यांनी दिली. 2024 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (late shivsena leader anand dighe biopic dharmaveer sequel release on ahead of election 2024)

धर्मवीर चित्रपटासाठी एकनाथ शिंदे यांनी पैसे लावले असा गैरसमज निर्माण केला गेला. परंतु या धर्मवीर या चित्रपटासाठी आपण आपले घर विकले असे देसाई म्हणाले. आगामी चित्रपटात कुठल्याही राजकीय व्यक्तीला अवावस्तव महत्त्व देणार नाही. हा चित्रपट संपूर्ण दिघे यांच्यावर असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटासाठी खुप मदत केली, तसेच त्यांच्या व्यक्तिरेखेला जास्त महत्त्व मिळू नये यासाठी त्यांनी आग्रह केला. अनेक सीन त्यांनी चित्रपटातून काढायला लावले असे देसाई म्हणाले. धर्मवीरच्या सिक्वेलमध्ये अनेक ट्विस्ट असतील आणि त्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची सहाय्यक भूमिकेत असणार आहे. धर्मवीर चित्रपटात पहिल्या भागात क्षितिज दाते या अभिनेत्याने शिंदे यांची भूमिका केली होती. 

अधिक वाचा : Sanjay Raut यांना मिळणार जामीन? या दिवसापर्यंत ठेवला न्यायालयाने ठेवला निकाल राखून


एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यावर बायोपिक काढायचा होता. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांनी बायोपिक काढला. एकनाथ शिंदे यांना हा बायोपिक आवडला नाही, हा चित्रपट नसून एक प्रकारचा माहितीपट असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले होते. म्हणून त्यांनी आनंद दिघे यांच्यावर बायोपिक निघावा अशी इच्छा होती. म्हणूनच धर्मवीर चित्रपटासाठी त्यांनी निर्मात्यांना सर्वतोपरी मदत केली अशी माहिती शिंदे यांच्या एका निकटवर्तीयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. 

अधिक वाचा :  Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

2024 मध्ये होणार प्रदर्शित

मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2022 च्या मे महिन्यात आनंद दिघे यांच्यावर आधारित धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला होता. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20१९ च्या जानेवारी महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मवीरचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. 

अधिक वाचा : Eknath shinde : गड्या आपला गावच बरा.., सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे रमले शेत-शिवारात

दिघेंचे अज्ञात पैलू

आगामी चित्रपटात आनंद दिघे यांचे अज्ञात पैलू दिसतील असेही माहिती निर्माते मंगेश देसाई यांनी दिली आहे. दिघे यांचे सामाजिक कार्य, त्यांच्या आयुष्यातील ट्विस्ट, त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील चढ उतार, त्यांचा अपघात, त्यांच्या मृत्यूनंतर झालेली हिंसा या सर्व गोष्टी आगामी चित्रपटात दाखवल्या जातील असे देसाई यांनी नमूद केले आहे. 

अधिक वाचा : नागपूर महामार्गावर Burning बसचा थरार; 35 प्रवासी असलेल्या ST ला भीषण आग

धर्मवीरचा शेवट

धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचा अपघात होते आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे. परंतु शेवटी एक पत्रकार ज्यांची भूमिका खुद्द निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे,ते दिघे यांच्या मुत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आनंद दिघे सात वाजेपर्यंत ठीक होते, सगळ्यांशी बोलत होते, हसत होते आणि अचानक गेले ? या वाक्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे दिघे यांची कथा अद्याप संपलेली नाही दिघे परत भेटीला येणार असे सांगतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी