CM Eknath Shinde : मला पण गुवाहाटीला न्या, चिमुकलीने केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हट्ट

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Jul 18, 2022 | 12:51 IST

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ५० आमदारांसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता एका चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीला नेण्याची गळ घातली आहे. इतकेच नाही तर तसे तिने प्रॉमिसही घेतले आहे. 

थोडं पण कामाचं
  • शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ५० आमदारांसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेले होते.
  • का चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीला नेण्याची गळ घातली आहे.
  • इतकेच नाही तर तसे तिने प्रॉमिसही घेतले आहे. 

CM Eknath Shinde : मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ५० आमदारांसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता एका चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीला नेण्याची गळ घातली आहे. इतकेच नाही तर तसे तिने प्रॉमिसही घेतले आहे. 

शिवसेनेचे बंडखोर जेव्हा गुवाहाटीला होते तेव्हा बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचे काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल ओक्केमध्ये आहे सगळे असा डायलॉग मारला होता. हा डायलॉग चांगलाच हिट झाला होता आणि त्याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. आज मुख्यमंत्री नवी मुंबई इथे गेले होते तेव्हा अन्नदा डामरे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटली. अन्नदा म्हणाली की पुरात जाऊन तुम्ही लोकांची मदत केली, अशाच प्रकारे मी मदत केली तर मी सुद्धा मुख्यमंत्री होईन का असा प्रश्न तिचे विचारला. तसेच आता तुम्ही मुख्यमंत्री झालात तुमचा नातू रुद्रांशला वेळ कसा देणार असा प्रश्न तिने विचारला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आता मला रुद्रांशच भेटायला इथे आला होता. नंतर अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक गळ घातली. दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला फिरायला नेणार का? त्यावर एकनाथ शिंदे हसले आणि कामाख्या मंदिराच्या दर्शनासाठी नक्की नेऊ असे प्रॉमिसही केले. तसेच मुलगी खूप हुशार आहे असे म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांची तिचे कौतुकही केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी