Thane Traffic: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

CM Eknath Shinde decision: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्प आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्यी आहेत. 

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फाईल फोटो) 

Thane traffic problem will be solved: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळते. त्यासोबतच मुसळधार पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि शहरात सुरू असलेली मेट्रोची कामे यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. नागरिकांना आपले कार्यालय, घर गाठण्यासाठी तासंतास प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या ठाण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. (Maharashtra cm Eknath Shinde instructs officers to undertake road repair work on priority in thane to provide immediate relief)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वाहतूक कोंडी होणार दूर

शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अधिक वाचा : Maharashtra Weather forecast: राज्यातील 'या' भागांत उद्या मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस

शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले. बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी केलेले नियमबाह्य गतिरोधक तातडीने काढण्यासाठीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

चिंचोटी ते अंजूर फाटा मार्ग

चिंचोटी ते अंजूर फाटा या मार्गामुळे ठाण्यातील वाहतुकीचे विभाजन होईल आणि त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष भर दिल्यास दळणवळणाच्या अंतर्गत सुविधा विकसित होणार आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वासही व्यक्त करुन मुरबे-पालघर रस्त्यामुले पालघरजवळील दापोलीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल आणि ३५ किमी अंतर कमी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी