Bhiwandi Crime: भिवंडीतील बालसुधारगृहात एका शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला शरीरसुखाची ऑफर दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षिका ही 40 वर्षीय असून पीडित मुलगा हा 17 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षेकेच्या विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेने त्या मुलाला आपल्या चुकांतून माफी मिळावी यासाठी शरीरसुखाची ऑफर दिली होती.
'तुझी तक्रार आली आहे की तू इतर मुलांना भडकवतोस, मास्तरांवर हात उचलला. या सर्वांतून तुला माफ करुन सुटका करते. पण त्यासाठी एक ऑफर आहे आणि ती म्हणजे शारीरिक सुखाची.' अशी ऑफर आरोपी शिक्षिकेने दिली होती.
हे पण वाचा : दगाबाज रे.... या कारणांमुळे पार्टनरला फसवतात मुलं-मुली
भिवंडीत राज्य सरकारच्यावतीने बालसुधारगृह चालवण्यात येते. येथील एका संस्थेकडून या ठिकाणचं काम पाहिलं जातं. या कामासाठी संस्थेला अनुदान सुद्धा मिळते. संस्थेकडून बालसुधारगृहाताली अल्पवयीन मुलांच्या शिक्षणासाठी काही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेशी संबंधित एका 40 वर्षीय शिक्षिकेने येथील काही मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पीडित मुलासोबतच इतरही मुलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे पण वाचा : या पत्त्यावर तिसरा 8 अंक तुम्हाला दिसला का? शोधा बरं
ज्या शिक्षिकेवर हा आरोप करण्यात आला आहे त्या शिक्षिकेने यापूर्वी संबंधित संस्थेचे डायरेक्टर आणि महिला डेप्युटी डायरेक्टर यांच्यावर अश्ली व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती. इतकेच नाही तर जातीवाचक शिवीगाळ सुद्धा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेला निलंबित केले होते.
हे पण वाचा : गरोदर असताना उपवास करावा की नाही?
पीडित मुलाला संबंधित शिक्षिकेने 28 सप्टेंबर रोजी ही शरीरसुखाची ऑफर दिली होती. शिक्षिकेच्या विरोधात काही दिवस आधीच म्हणजेच 21 मार्च 2023 रोजी तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलासोबत इतर दोन मुलांची सुद्धा चौकशी सुरू असून त्याच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की, तक्रार दाखल करण्यासाठी इतका उशीर का झाला? या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.