भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असताना अपघात, ५ जखमी

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 02:29 IST

Maharashtra: Five injured in Bhiwandi metro work site mishap ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत मेट्रोच्या एका पुलाचे काम सुरू असताना अपघात झाला आणि पाच मजूर जखमी झाले. शनिवारी (१३ नोव्हेंबर २०२१) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात मराठा पंजाब हॉटेल जवळ अंजुरफाटा परिसरात झाला.

Maharashtra: Five injured in Bhiwandi metro work site mishap
भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असताना अपघात, ५ जखमी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असताना अपघात, ५ जखमी
  • दुपारी तीनच्या सुमारास अपघात
  • अपघात मराठा पंजाब हॉटेल जवळ अंजुरफाटा परिसरात

Maharashtra: Five injured in Bhiwandi metro work site mishap । भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत मेट्रोच्या एका पुलाचे काम सुरू असताना अपघात झाला आणि पाच मजूर जखमी झाले. शनिवारी (१३ नोव्हेंबर २०२१) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात मराठा पंजाब हॉटेल जवळ अंजुरफाटा परिसरात झाला.

पुलाचे बांधकाम करण्यासाठी लोखंडी खांब उभे-आडवे एकावर एक असे रचून एक सांगाडा तयार केला होता. या सांगाड्यातील एक खांब निखळला आणि लोखंडी खांबांचा सांगाडा कोसळला. अपघातामध्ये पाच मजूर किरकोळ जखमी झाले. जखमी मजुरांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेट्रो प्रशासनाने घटनास्थळी पडलेल्या लोखंडी खांबांना हटवून मेट्रोचे काम नियोजनानुसार सुरू राहावे यासाठी आवश्यक ते उपाय केल्याचे सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी