पोरांना कडक सॅल्यूट ! स्वत:चा जीव धोक्यात घालून दरीत पडलेल्या वासराला तरुणांनी दिले जीवनदान, पाहा LIVE VIDEO

Maharashtra youths save a calf lying in deep valley watch video: दरीत पडलेल्या एका वासराला तरुणांनी सुखरूप बाहेर काढले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून वासराला बाहेर काढल्याने सर्वत्र या मुलांचे कौतुक होत आहे. 

Maharashtra rain panvel youths save a calf lying in deep valley watch live video of rescue operation
पोरांना कडक सॅल्यूट ! स्वत:चा जीव धोक्यात घालून दरीत पडलेल्या वासराला तरुणांनी दिले जीवनदान, पाहा LIVE VIDEO 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे 
  • मुसळधार पावसात एक वासरू खोल दरीत पडला
  • तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वासराला बाहेर काढले, तरुणांवर होतोय कौतुकांचा वर्षाव

पनवेल : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर अनेक नद्याही ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्याच दरम्यान काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसात तरुणांनी केलेल्या एका कौतुकास्पद कार्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. दरीत पडलेल्या एका वासराचे प्राण तरुणांनी वाचवले आहेत. (Panvel youths save a calf lying in deep valley watch video)

पनवेल (Panvel) तालुक्यातील वावंजे परिसरात एका दरीत पडलेल्या वासराला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला असून तो तुफान व्हायरल होत आहे.

तरुणांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मलंगगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या वावंजे परिसरात एका दरीत एक वासरू पडलं होतं. हे वासरू गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्या ठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली. ही माहिती समोर येताच स्थानिक तरुणांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

दरी प्रचंड खोल असल्याने या वासराला तेथून बाहेर येणं अशक्य होतं. हेच लक्षात घेत स्थानिक तरुणांनी दोरीच्या सहाय्याने या वासराला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

हे पण वाचा : शरद पवारांमुळे शिवसेनेत फुट? , केसरकरांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

दरी प्रचंड खोल होती आणि तेथे सुरक्षा कठडाही नाहीये. अशा परिस्थितीत या तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून या वासराला सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर या तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत वासराची सुटका केली. या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वासराला सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचं प्रचंड कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी