जमिनीच्या वादातून डोंबिवलीत हत्या, झारखंडमधून एकाला अटक

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 20, 2021 | 09:35 IST

Maharashtra: Two brothers kill cousin over property dispute in Dombivli, one held in Jharkhand जमिनीच्या वादातून डोंबिवलीत एकाची हत्या झाली. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी झारखंडमधून कालू महतो याला अटक केली.

Maharashtra: Two brothers kill cousin over property dispute in Dombivli, one held in Jharkhand
जमिनीच्या वादातून डोंबिवलीत हत्या, झारखंडमधून एकाला अटक 
थोडं पण कामाचं
  • जमिनीच्या वादातून डोंबिवलीत हत्या, झारखंडमधून एकाला अटक
  • एका आरोपीचा शोध सुरू
  • आरोपींनी दगडफेक करुन केली होती हत्या

Maharashtra: Two brothers kill cousin over property dispute in Dombivli, one held in Jharkhand डोंबिवली: जमिनीच्या वादातून डोंबिवलीत एकाची हत्या झाली. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी झारखंडमधून कालू महतो याला अटक केली. लालू महतो याचा शोध सुरू आहे. लालू आणि कालू हे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांच्यावर चुलत भावाच्या हत्येचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मूळचा झारखंडचा असलेला पूरन महतो डोंबिवलीतील गोलिवली भागात मजूर म्हणून काम करत होता. पूरनचे चुलत भाऊ पण डोंबिवलीतच वास्तव्यास होते. झारखंडमध्ये गावात असलेल्या २० गुंठे जमिनीवरुन भावांमध्ये वाद सुरू होता. वाद वाढला आणि ४ नोव्हेंबर रोजी लालू आणि कालू या सख्ख्या भावांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या पूरनवर दगडफेक केली. या दगडफेकीत पूरन गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना ८ नोव्हेंबर रोजी पूरनचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. 

ठोस माहिती मिळताच आरोपी लालू आणि कालू यांना अटक करण्यासाठी मानपाडा पोलिसांचे पथक झारखंडला गेले. गावात स्थानिकांनी मानपाडा पोलिसांच्या कारवाईला तीव्र विरोध केला. पण पोलिसांनी हुशारीने मार्ग काढून कालू महतो याला अटक केली. लालू महतो यालाही लवकर शोधून अटक करू, असे पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी