...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला करुन घेतलं सेल्फ क्वारंटाईन

ठाणे
पूजा विचारे
Updated Apr 13, 2020 | 16:15 IST

जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती समोर आली आहे. आव्हाड यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतलं आहे.

jitendra awhad
...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला करुन घेतलं सेल्फ क्वारंटाईन  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतलं आहे.
  • . जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
  • कोरोनाग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. 

ठाणेः  महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. 

ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाईन करण्यात आलं आहे. आव्हाड हे मुंब्रातील कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरात सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. आव्हाड यांची टेस्ट केली असून ती निगेटिव्ह आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने खबरदारीसाठी सेल्फ क्वारंटाइन करण्याची ही पहिली वेळ असेल.

गृहनिर्माण मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड हेदेखील आपला मतदारसंघ असलेल्या कळवा आणि मुंब्र्यात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या स्थितीचा वारंवार आढावा घेत होते. त्यावेळी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क आला जो आता कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे, अशी माहिती आहे. संबंधित कोरोनाग्रस्त पोलिसाच्या संपर्कात आलेले इतर पोलीस कर्मचारी, पत्रकार, अधिकाऱ्यांच्याही  कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करू घेतल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं. त्यावर ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.

गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कळवा मुंब्रा मतदारसंघात जाऊन नागरिकांना घरी बसण्यास बजावलं होतं. जीवाशी खेळू नका, घराबाहेर पडाल, तर 14 दिवस तुरुंगात पाठवण्याची तरतूद केली आहे, अशी ताकीदच त्यांनी दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी