Kalyana Attack on Family : कल्याण:  पत्नी आणि मुलावर केला जीवघेणा हल्ला, आत्महत्या करून संपवली जीवनयात्रा, कल्याणमधील धक्कादायक घटना

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Dec 13, 2021 | 16:33 IST

कल्याणमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. man attack on wife and son commit suicide kalyan

blood crime scene
पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या 
थोडं पण कामाचं
  • कल्याणमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या
  • जखमी मुलाला आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू

Kalyana Attack on Family : कल्याण: कल्याणमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

man attack on wife and son commit suicide kalyan

मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या चिकनघर भागात निखिला हाईट्स ही उच्चभ्रू रहिवासी सोसायटी आहे. या सोसायटीत प्रमोद बनोरिया हे आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. बनोरिया मोटरमन म्हणून काम करायचे आणि रेल्वेतून निवृत्त झाले होते.

रविवारी रात्रीच्या सुमारास बनोरिया यांनी आपल्या मुलावर आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. नंतर बनोरिया यांनी आत्महत्य केली. नंतर मुलगा लोकेशने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकाला काही तरी गंभीर घडल्याचा संशय आला. त्याने सोसायटील लोकांना बोलवून बनोरिया यांच्या घरी गेला. तेव्हा बनोरिया हे निपचित अवस्थेत पडले होते आणि त्यांचा मुलगा आणि पत्नी वेदनेने विव्हळत होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बनोरिया यांनी कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलावर हल्ला करून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी